मलकापुरात पाणी योजनेच्या सेटलिंग टँकची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:17+5:302021-03-07T04:35:17+5:30
मलकापुरात नागरिकांच्या वाढत्या पाणी वापरामुळे जास्तीत जास्त पंपिंग करावे लागत असून, दिवसेंदिवस पंपिंग तास वाढल्याचे दिसून आले आहे. या ...
मलकापुरात नागरिकांच्या वाढत्या पाणी वापरामुळे जास्तीत जास्त पंपिंग करावे लागत असून, दिवसेंदिवस पंपिंग तास वाढल्याचे दिसून आले आहे. या योजनेंतर्गत जॅकवेल, सेटलिंग टँकसह सात वितरण टाक्यांच्या माध्यमातून शहराला चोवीस तास शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. या सर्व टाक्यांची वरचेवर साफसफाई केली जाते. त्यापैकी पावसाळ्यानंतर सेटलिंग टँकमध्ये गाळ साचलेला असतो. याची खबरदारी म्हणून दरवर्षी जॅकवेल व इंटकवेलची साफसफाई केली जाते. काही दिवसांपूर्वी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे साफसफाई करण्यात आली, तर टप्प्याटप्प्याने सहा महिन्यांतून एकदा संपूर्ण वितरण टाक्या व सेटलिंग टँकचा मेंटेनन्स केला जातो. त्यातीलच एक भाग म्हणून पालिका कर्मचाऱ्यांनी नुकतेच सेटलिंग टँक शंभर टक्के रिकामा करून साफसफाई केली.
या चोवीस तास पाणी पुरवठ्याचे नियोजन करून योजनेची वेळोवेळी साफसफाईची कामे करताना या विभागातील कर्मचाऱ्यांना तारेवरील कसरत करावी लागते. यावेळी सेटलिंग टँकच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या वाढीव कामामुळे पहिल्यांदाच कमी दाबाने पाणी पुरवठा राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा सभापती व उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले आहे.
- चौकट
आधुनिक तंत्राचा वापर
मलकापुरात गत तेरा वर्षांपासून शहरात चोवीस तास पाणी पुरवठा सुरू आहे. यावेळी सेटलिंग टँकच्या रंगरंगोटीचे कामही हाती घेतले आहे. अशी कामे करताना पालिका प्रशासनाने आधुनिक तंत्राचा वापर केला आहे.
- चौकट
पाणी योजनेचा लेखाजोखा
१) २००८ ला योजना सुरू करण्यात आली.
२) सुरुवातीला तीन हजार कनेक्शन, माणसी ७० लिटर पाणी गृहीत धरण्यात आले.
३) लोकसंख्या वाढल्याने योजनेचा आराखडा बदलण्यात आला.
४) आजअखेर आठ हजारांवर नळ कनेक्शन देण्यात आली आहेत.
५) माणसी १५० लिटरप्रमाणे पाणी वापर होत आहे.
६) सलग तेरा वर्षे अखंडितपणे ही योजना पाणी पुरवठा करीत आहे.
फोटो : ०६केआरडी०१
कॅप्शन : मलकापुरात चोवीस तास पाणी योजनेच्या सेटलिंग टँकसह फिल्टर बेडच्या साफसफाईचे काम करून रंगरंगोटी करण्यात आली आहे.