गोडोलीच्या मावळ्यांकडून मुंबईत स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:41 PM2017-08-10T23:41:57+5:302017-08-10T23:42:00+5:30

Cleanliness in Goddess of Godoli | गोडोलीच्या मावळ्यांकडून मुंबईत स्वच्छता

गोडोलीच्या मावळ्यांकडून मुंबईत स्वच्छता

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मुंबई येथील मराठा मोर्चात सहभागी झालेल्या साताºयातील अनेक मावळ्यांनी आपला सातारी बाणा तिथेही दाखविला. मोर्चानंतर त्यांनी आझाद मैदानाची स्वच्छताही केली.
मुंबई येथे बुधवारी मराठा समाजाचा महामोर्चा पार पडला. या मोर्चाने गर्दीचा उच्चांक गाठला होता. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश व परदेशातील मराठा समाजाने या मोर्चात सहभाग घेतला.
मुंबईत अक्षरश: मराठ्यांची लाट आलेली जगाने पाहिली. या लाटेचे फोटो सोशल मीडियातून तत्काळ व्हायरल झाले.
मोर्चानंतर आझाद मैदानामध्ये पडलेले प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा गोडोलीतील कार्यकर्त्यांनी उचलला. रवी पवार, गणेश निकम, प्रशांत मोरे, प्रशांत जाधव, हणमंत चव्हाण, दादा चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, युवराज जाधव, अमोल काटकर व त्यांचे इतर सहकारी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
मैदानात पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, पाण्याच्या बाटल्या असा कचरा उचलून त्यांनी तो कचराकुंड्यांत टाकला. सातारकर कुठेही गेले तरी स्वच्छतेच्या बाबतीत किती दक्ष आहेत, हेच यातून समोर आले.
सातारकरांच्या या स्तुत्य उपक्रमाने मुंबईकरही भारावून गेले होते. सातारा शहरातही काही महिन्यांपूर्वी असाच मोर्चा निघाला होता.
या मोर्चानंतर अवघ्या एक तासात बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी शहराची स्वच्छता केली होती.

Web Title: Cleanliness in Goddess of Godoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.