वातावरणात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:45 AM2021-09-15T04:45:37+5:302021-09-15T04:45:37+5:30
पाचगणी : पाचगणी शहरासह परिसरात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पाऊस पडत आहे. वातावरणात बदल झालेला आहे. त्यामुळे ...
पाचगणी : पाचगणी शहरासह परिसरात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पाऊस पडत आहे. वातावरणात बदल झालेला आहे. त्यामुळे आजारी पडणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, थंडी, ताप आदी आजाराने अनेकजण त्रस्त आहेत.
वाईमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद
वाई : महाबळेश्वर हे पाचगणीपासून काही अंतरावरच असल्याने वाईमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, संबंधित विभागाला याकडे पाहण्यासाठी वेळ नसल्याचे जाणवत आहे. चोरीच्या घटना घडत आहेत. बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी होत आहे.
मार्गदर्शक फलक
वाई : वाईहून महाबळेश्वर, पाचगणीकडे जाण्यासाठी पर्यटकांना पसरणी घाटातूनच जावे लागते. घाटात मार्गदर्शक फलकाची वानवा असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे नवख्या पर्यटकांची फसगत होत असते. तीव्र उतारावर अपघातांचा धोका असल्याने मार्गदर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे.
कठडे ढासळलेलेच
पेट्री : येवतेश्वर घाटात अनेक दिवसांपासून संरक्षक कठडे ढासळले आहेत. ते अजूनही कायम आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालविताना अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन ढासळलेले कठडे दुरुस्त करावेत, अशी मागणी केली जात आहे.
पुलाखाली अतिक्रमण
सातारा : सातारा शहरातून गेलेल्या पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी उड्डाणपूल केले आहेत. मात्र, पुलाखाली अनेकजणांनी वर्षानुवर्षे अतिक्रमण केले आहे. त्याच ठिकाणी लोक सहकुटुंब राहात आहेत. येथे राहात असलेल्या नागरिकांना योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे.