बंद एटीएम केंद्रांनी अखेर गाठली पन्नाशी

By admin | Published: December 29, 2016 10:33 PM2016-12-29T22:33:24+5:302016-12-29T22:33:24+5:30

नोटाबंदीचा फटका : असंख्य मशिन्स् दीड महिन्यापासून बंदच अवस्थेत

Closed ATM centers finally reach fifty | बंद एटीएम केंद्रांनी अखेर गाठली पन्नाशी

बंद एटीएम केंद्रांनी अखेर गाठली पन्नाशी

Next

सातारा : नोटाबंदीच्या निर्णयानंतर एक दिवस देशभरातील एटीएम बंद होते. त्यानंतर मोजक्याच एटीएममध्ये भरणा झाला. त्यामुळे बहुसंख्य एटीएम दीड महिन्यानंतरही बंद अवस्थेत आहेत. टाळंच लावलं असल्याने दरवाजाजवळ जळमाटं साचली होती. काही ठिकाणी एटीएम बंद असले तरी यंत्रांमध्ये खडखडाट कायम आहे.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबरला चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर एक दिवस सर्वच एटीएम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकांकडेच नोटांचा तुटवडा असल्याने त्यानंतरही काही एटीएम बंद अवस्थेत होते.
एटीएमच बंद असल्याने काही बँकांनी शटर लावून कुलूप लावले. सुरक्षारक्षकांना सुटी देऊन टाकली. त्यामुळे महिनाभर या एटीएमकडे कोणीही फिरकले नव्हते. त्यामुळे एटीएम केंद्राबाहेर जळमाट, धूळ साठली होती. राजवाडा परिसरातील एका एटीएमच्या दारात कुत्रं झोपले होते. काही तरुणांनी या घटनेचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकले होते. त्याचप्रमाणे इतर शहरांमध्ये बंद एटीएमवरून विनोदी पोस्ट टाकले जाऊ लागले. त्यानंतर एसटीएम समोरची स्वच्छता केली गेली. परंतु एटीएममधील नोटांचा खडखडाट दीड महिन्यानंतरही कायम आहे. (प्रतिनिधी)
फलटणमध्ये
एटीएमला श्रद्धांजली
नोटाबंदीनंतर ४८ दिवस होऊनही सामान्यांचे हाल सुरू आहेत. एटीएम बंद आहेत. शासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध म्हणून रणजित नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे, शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व फलटण तालुका युथ काँग्रेस व एनएसयुआयतर्फे एटीएमला हार घालून श्रद्धांजली वाहिली. युथ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमित रणवरे, विशाल नलावडे, बबलु मोमीन, स्वराज संघटनेचे शहराध्यक्ष अनिकेत कदम, रोहित झांजुर्णे, बबलु पठाण, रोहित जाधव, विनोद मिंड उपस्थित होते.

Web Title: Closed ATM centers finally reach fifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.