फलटण शहरासह तालुक्यातील आठ गावांमध्ये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:41 AM2021-05-09T04:41:00+5:302021-05-09T04:41:00+5:30

फलटण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी संपूर्ण फलटण शहरासह ...

Closed in eight villages in the taluka including Phaltan city | फलटण शहरासह तालुक्यातील आठ गावांमध्ये बंद

फलटण शहरासह तालुक्यातील आठ गावांमध्ये बंद

googlenewsNext

फलटण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी संपूर्ण फलटण शहरासह तालुक्यातील आठ गावांत ९ ते १५ मेदरम्यान प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून दवाखाने व औषध दुकाने वगळता दूध, भाजीपाला, किराणा या अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापार, व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या आदेशानुसार संपूर्ण फलटण शहर आणि तालुक्यातील कोळकी, फरांदवाडी, साखरवाडी, वाठार निंबाळकर, वाखरी, जाधववाडी, विडणी आणि तरडगाव या आठ गावांतील प्रतिबंधित क्षेत्रांत सर्व नियमांचे काटेकोर पालन आणि कायदा-सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे निदर्शनास आणून देत कोणीही घराबाहेर न पडता घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करावे. प्रतिबंधित क्षेत्रात किराणा, दूध, फळे, भाजीपाला घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही जगताप यांंनी स्पष्ट केले.

Web Title: Closed in eight villages in the taluka including Phaltan city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.