पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीतील धग थांबता थांबेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:33+5:302021-05-28T04:28:33+5:30
माणिक डोंगरे मलकापूर : पाचवडेश्वर स्मशानभूमीत ११ सप्टेंबर २०२० पासून अंत्यविधीचे काम सुरू आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ९५ मृतदेह ...
माणिक डोंगरे
मलकापूर : पाचवडेश्वर स्मशानभूमीत ११ सप्टेंबर २०२० पासून अंत्यविधीचे काम सुरू आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ९५ मृतदेह स्मशानभूमीत दाखल झाले तर दुसऱ्या लाटेत ४ एप्रिलपासून २६ दिवसांत ४६ आणि मे महिन्यात २६ दिवसांत तब्बल ११० मृतदेहांवर अंत्यविधी करण्यात आले. कोरोनाच्या ९ महिन्यांत सर्वाधिक मृतदेह हे या २६ दिवसांत अंत्यसंस्कारासाठी आले आहेत. यावरून या महिन्यात मृत्युदर वाढल्याने स्मशानभूमीतील धग थांबता थांबेना, अशी स्थिती झाली आहे.
येथील पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीचे दायित्व मलकापूर पालिकेने स्वीकारले आहे. ११ सप्टेंबर २०२० ला अंत्यविधीस सुरुवात झाली. पश्चिम महाराष्ट्रातील मोठे असलेले कृष्णा रुग्णालय मलकापुरात असल्यामुळे तुलनेने जास्तीतजास्त कोरोनाबाधितांवर उपचारही याच रुग्णालयात होतात. दिवसेंदिवस गावोगावी बाधितांची संख्या वाढतच गेली. त्याच प्रमाणात बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत गेले. कृष्णा रुग्णालयात मयत झालेल्या कोणत्याही गावचा मृतदेह असला तरी याच स्मशानभूमीत अंत्यविधी केला जातो. त्याचबरोबर क्रांती सर्जिकल आयसीयू सेंटर, वारणा कोविड सेंटरसह काले १६ व येवती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २५ अशा ४१ गावांचा समावेश आहे. मलकापूर शहर, काले प्राथमिक आरोग्य केंद्र व येवती प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ४१ गावांसह कृष्णा रुग्णालय, क्रांती सर्जिकल आयसीयू सेंटरमधील कोविडबाधित मृतदेहांवर अंत्यविधीची विनामूल्य सोय केली आहे. अमर तडाखे, कृष्णा दणाने, यशवंत काटवटे, रोहित काटवटे, आशिष कुरले, राहुल वीरकायदे, अरुण कुरले या कोविड स्मशानभूमीतील पालिकेच्या कोरोनायोद्ध्यांनी ९ महिन्यांत तब्बल २५१ मृतदेहांना सन्मानाने निरोप दिला आहे.
चौकट
रुग्णालयनिहाय आलेले मृतदेह
कृष्णा रुग्णालय २२०, वारणा कोविड सेंटर १, मलकापूर पालिका हद्दीतील ७, प्राथमिक आरोग्य केंद्र काले ५, सवादे प्राथमिक आरोग्य केंद्र ३, क्रांती सर्जिकल आयसीयू १५ अशा एकूण २५१ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चौकट
नऊ महिन्यांचा लेखाजोखा...
सप्टेंबर ३२, ऑक्टोबर ३८, नोव्हेंबर १६, डिसेंबर ८, जानेवारी १, फेब्रुवारी ०, मार्च ०, एप्रिल ४६, मे ११०.
चौकट
केवळ ५२ दिवसांत १५६ जणांचा मृत्यू...
पहिल्या लाटेत ९५ मृतदेहांवर तर दुसऱ्या लाटेमध्ये दि. ५ एप्रिलपासून तब्बल १५६ कोरोनाबाधित मृतदेहांवर विनामूल्य अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या महिन्यात २६ दिवसांत ११० कोरोनाबाधितांचे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे.
२७मलकापूर
पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीत मलकापूर पालिकेच्या कोरोना योद्ध्यांनी ९ महिन्यांत तब्बल २५१ मृतदेहांना सन्मानाने निरोप दिला आहे.
===Photopath===
270521\img_20210527_171206.jpg
===Caption===
फौटो कॕप्शन
पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीत मलकापूर पालिकेच्या कोरोनायोध्यांनी ९ महिन्यात तब्बल २५१ मृतदेहाला सन्मानाने निरोप दिला आहे. (छाया माणिक डोंगरे)