जिल्ह्यात ढगाळ वातावरण; उन्हाची तीव्रता झाली कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:05+5:302021-05-20T04:43:05+5:30
सातारा : जिल्ह्यात दोन दिवस तौउते चक्रीवादळामुळे पाऊस झाला. मंगळवारी काही ठिकाणी हलका पाऊस पडला; पण बुधवारी जिल्ह्यात बहुतांश ...
सातारा : जिल्ह्यात दोन दिवस तौउते चक्रीवादळामुळे पाऊस झाला. मंगळवारी काही ठिकाणी हलका पाऊस पडला; पण बुधवारी जिल्ह्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते, तर कमाल तापमान उतरल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली आहे.
जिल्ह्यात मागील आठ दिवसांपूर्वी वळवाचा पाऊस सुरू झाला. तीन दिवस वळवाचा पाऊस पडल्यानंतर तौउते चक्रीवादळचा प्रभाव जाणवला. त्यामुळे दोन दिवस वारे वाहत होते, तसेच पाऊसही पडला. जिल्ह्यात या पावसाने सर्वदूर हजेरी लावली. तौउते चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर जिह्यात मंगळवारी काही ठिकाणी ऊन पडले होते, तर अनेक भागांत ढगाळ वातावरण होते. सातारा शहर आणि परिसरात दिवसभर ऊन नव्हते. ढगाळ वातावरण कायम होते. दुपारच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला, तर सायंकाळच्या सुमारास थंडगार वारे वाहण्यास सुरुवात झाली होती, तर बुधवारी सातारा शहरासह परिसरात ढगाळ वातावरण कायम होते. दुपारच्या सुमारास काही वेळच ऊन जाणवले. त्यातच पाऊस झाल्याने व ढगाळ वातावरणामुळे सातारा शहराचे कमाल तापमान कमी झाले आहे. बुधवारी ३१.०१ अंशाची नोंद झाली, तर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कमाल तापमानात उतार आला आहे. यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाल्याने उकाडा कमी झाला आहे.
चौकट :
सातारा शहरात नोंद झालेले
कमाल तापमान असे...
दि. ५ मे ३७.०४, ६ मे ३६.०६, ७ मे ३५.०६, ८ मे ३६.०१, ९ मे ३६.०६, १० मे ३८.०१, ११ मे ३७.०१, १२ मे ३७.०२, १३ मे ३४.०६, १४ मे ३७.०१, १५ मे ३५.०६, १६ मे २७.०७, १७ मे २६.०४, १८ मे २९.०९ आणि १९ मे ३१.०१.
.........................................................................