जिल्ह्यात ढगाळ वातावरण; किमान तापमान १८ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:10 PM2020-12-11T17:10:02+5:302020-12-11T17:12:03+5:30
Temperature, Satara area, Winter Session Maharashtra सातारा जिल्ह्यातील वातावरणात सतत चढ-उतार होत असल्याने थंडीतही फरक चालला आहे. चार दिवसांपूर्वी किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आलेले. पण, सध्या १८ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे थंडी गायब झाली आहे. तर ढगाळ हवामान तयार होत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
सातारा : जिल्ह्यातील वातावरणात सतत चढ-उतार होत असल्याने थंडीतही फरक चालला आहे. चार दिवसांपूर्वी किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आलेले. पण, सध्या १८ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे थंडी गायब झाली आहे. तर ढगाळ हवामान तयार होत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीला सुरुवात झाली होती. त्यानंतर हळूहळू थंडीत वाढ झाली. दिवाळीच्या काळात तर जिल्ह्यातील किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले होते. मात्र, त्यानंतर वातावरणात बदल झाला. त्यामुळे किमान तापमान २० अंशावर पोहोचले होते. थंडी कमी होऊन उकाडाही जाणवत होता.
काही दिवस तापमान वाढले. पण, त्यानंतर किमान तापमान १५ अंशाच्या खाली आले. चार दिवसांपूर्वी तर साताऱ्यात १२.०२ अंशापर्यंत तापमान उतरले होते. त्यामुळे थंडीचा कडाका पडला होता. अशी स्थिती एकच दिवस होती. मात्र, त्यानंतर तापमान १७ अंशावर पोहोचले. तर मागील दोन दिवसांपासून किमान तापमान १८ अंशावर पोहोचले आहे. परिणामी थंडीचा जोर एकदम कमी झाला आहे.
शुक्रवारी तर सातारा शहरातील किमान तापमान १८.०७ अंश नोंदले गेले. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झालेले. यामुळे बोचरी थंडी काही प्रमाणात जाणवत होती. तर या ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
साताऱ्यात नोंद झालेले किमान तापमान असे
दि. १ डिसेंबर १८.०४, दि. २ डिसेंबर १७.०२, दि. ३ डिसेंबर १४.०५, दि. ४ डिसेंबर १२.०९, दि. ५ डिसेंबर १३.०३, दि. ६ डिसेंबर १३, दि. ७ डिसेंबर १२.०२, दि. ८ डिसेंबर १७, दि. ९ डिसेंबर १७ आणि दि. १० व ११ डिसेंबर १८.०७.