वाहनतळ नामकरणाच्या विरोधात महाबळेश्वरात कडकडीत बंद

By admin | Published: March 22, 2017 01:33 PM2017-03-22T13:33:30+5:302017-03-22T13:33:30+5:30

बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा,शहरात शुकशुकाट

Cluttering against vehicle designation in Mahabaleshwar | वाहनतळ नामकरणाच्या विरोधात महाबळेश्वरात कडकडीत बंद

वाहनतळ नामकरणाच्या विरोधात महाबळेश्वरात कडकडीत बंद

Next

आॅनलाईन लोकमत
महाबळेश्वर : येथील रे-गार्डन वाहनतळाचे नामकरण ह्यछत्रपती संभाजी महाराज वाहनतळह्णअसे केले असताना पालिकेच्या वतीने या वाहनतळाचे नामकरण ह्यभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळह्ण असे करण्यात आले. मंगळवारी झालेल्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाविरोधात बुधवारी (दि. २२) विविध संघटनांच्या वतीने ह्यमहाबळेश्वर बंदह्णची हाक देण्यात आली. या बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला असून, शहरात शुकशुकाट पसरला आहे.


महाबळेश्वर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी तत्कालीन नगराध्यक्ष संतोष आखाडे यांच्या समवेत येथील रे-गार्डन वाहनतळाची पाहणी केली होती. तसेच वेण्णा दर्शन विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वाहनतळास ह्यधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वाहनतळह्ण असे नाव देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार रे-गार्डन वाहनतळावर ह्यछत्रपती संभाजी महाराज वाहनतळह्ण या नावाचा फलकही लावण्यात आला.


दरम्यान, पालिकेने रे-गार्डन या वाहनतळास नाव दिले नसल्याचे कारण पुढे करीत मंगळवारी (दि. २१) झालेल्या सर्वसाधारण सभेत या वाहनतळाचे नाव बदलून ह्यभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळह्ण असे नामकरण करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. दरम्यान, पालिकेच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी महाबळेश्वर बंदची हाक दिली होती. यानुसार बुुधवारी महाबळेश्वरमधील व्यापाऱ्यांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. ह्यबंदह्णमध्ये सर्वच व्यापारी सहभागी झाल्याने मुख्य बाजारपेठेत दिवसरभर शुकशुकाट पसरला होता.
पालिकेच्या या निर्णयाविरोधात विविध संघटनांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत वाहनतळाच्या नामकरणाबाबत चर्चा होणार असून, आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: Cluttering against vehicle designation in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.