मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत उपचारार्थी रुग्णांसोबत मुख्यमंत्री महोदयांनी घेतला दिवाळी फराळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2023 01:23 PM2023-11-14T13:23:08+5:302023-11-14T13:24:27+5:30
रुग्णांसोबत मनमोकळा सवांद साधला .!
लोकमत न्यूज नेटवर्क, पाचगणी, (दिलीप पाडळे): मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत अर्थसाह्यतून मोफत उपचारार्थ जीवनदान लाभलेल्या बाल चिमुकल्या रुग्णांसोबत वर्षा निवासस्थानी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी फराळ केला त्याचं बरोबर या रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली तर या रुग्णांना दिवाळी गिफ्ट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी बाल रूग्णांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता..!
मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसाह्य मिळून उपाचारातून बरे झालेल्या रुग्णांच्या करीता हा दिवाळी फराळ कार्यक्रम मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आयोजित केला होता. मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात. यावेळी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजारातून बरे झालेले छोटे बाल रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत दिवाळी फराळ केला. तसेच या रुग्णांच्या सोबत दिलखुलास संवाद साधला यावेळी उपस्थित रुग्णांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिवाळी गिफ्ट हम्पर देण्यात आले.
या दिवाळी फराळ कार्यक्रमास खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे, डॉ. मिलिंद शिंदे तसेच अनेक रुग्णसेवक, रुग्ण दाते उपस्थित होते. डॉ. मिलिंद शिंदे यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील रामवाडी गावचा यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपचारार्थी बालरुग्ण चिमुकला कु. आरूष संदीप सणस हा पूर्णतः बरा झाला असून याला सुद्धा मुख्यमंत्री फराळा करीता निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना डॉ. मिलिंद शिंदे म्हणाले की, वाई, जावळी, महाबळेश्वर, तसेच सातारा जिल्ह्यातील रुग्णांनी मुख्यमंत्री सहायता निधीचा विनियोग करून घ्यावा. त्याकामी सर्वोतोपरी सहकार्य मी स्वतः करणार आहे. फक्त रुग्णांनी पुढे या रुग्णसेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी या माध्यमातून केलं आहे.