कोपर्डे हवेलीत चोरट्यांचा पुन्हा धुडगूस; साडेतेरा तोळे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:15 PM2018-11-11T23:15:03+5:302018-11-11T23:15:07+5:30
कºहाड/कोपर्डे हवेली : कºहाड दक्षिणेतील टाळगाव आणि कासारशिरंबे गावात जबरी चोरी केल्यानंतर चोरट्यांच्या टोळीने आपला मोर्चा कºहाड उत्तरेतील गावांकडे ...
कºहाड/कोपर्डे हवेली : कºहाड दक्षिणेतील टाळगाव आणि कासारशिरंबे गावात जबरी चोरी केल्यानंतर चोरट्यांच्या टोळीने आपला मोर्चा कºहाड उत्तरेतील गावांकडे वळविला आहे. शनिवारी रात्री कोपर्डे हवेली येथे धुडगूस घालून त्यांनी साडेतेरा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच अन्य घरांमध्ये घुसून चोरीचा प्रयत्न केला. या घटनेने कोपर्डेसह आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऐन दिवाळीत चोरट्यांनी तालुक्यातील टाळगाव आणि कासारशिरंबे गावामध्ये घुसून घरफोड्या केल्या होत्या. बुधवारी, दि. ७ रात्री ही घटना घडली होती. दोन घरांतून चोरट्यांनी सहा लाखांचे दागिने लंपास केले होते. ही घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री कोपर्डे हवेलीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरटे कोपर्ड हवेलीतील मुख्य रस्त्याच्याकडेलाच असलेल्या संगीता सुनील रसाळ यांच्या घरात घुसले. त्यांनी संगीता यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चैन हिसकावून घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गळ्यातील चैन ओढत असताना संगीता यांना जाग आली. मात्र, डोळ्यावर बॅटरीचा उजेड पाडल्याने त्यांना समोरचे काहीच दिसले नाही. तेव्हा संगीता यांनी चैन ओढून धरली होती. मात्र, चोरट्यांनी जोराचा हिसका दिल्याने त्यांच्या हातातून चैन सुटली. त्याचवेळी संगीता यांनी चोरट्यांच्या हातात असलेला लोखंडी गज पकडला. तसेच चैन परत मागितली. मात्र, चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यामुळे संगीता यांनी गज सोडला. त्यामुळे चोरटे तेथून पसार झाले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रानजीक असलेल्या रामचंद्र शिवाजी साळवे यांच्या घराकडे वळवला. त्यांनी दाराची कडी काढून आत प्रवेश केला. घरातील सर्वजण झोपेत असताना आतल्या खोलीत असलेल्या कपाटाचे दार उघडून त्यांनी कपाटातील ७० हजार रुपये किमतीचा तीन तोळ्यांचा राणीहार, ५० हजार रुपयांची अडीच तोळ्यांची मोहनमाळ, ३० हजारांचा दीड तोळे वजनाचा लक्ष्मीहार, ४० हजारांच्या दोन तोळ्यांच्या चैन, २० हजारांच्या एक तोळ्याच्या अंगठ्या यासह अन्य असे सुमारे बारा तोळ्यांचे दागिने आणि पाच हजारांची रोकड चोरून पोबारा केला.
दरम्यान, रात्री रामचंद्र यांचे वडील शिवाजी यांना जाग आली. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा केला.