कोयनेचे दरवाजे दहा फुटांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 11:46 PM2019-09-04T23:46:35+5:302019-09-04T23:46:39+5:30

कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास धरणाचे सहा वक्री दरवाजे दहा फुटांवर उघडण्यात ...

Coin doors ten feet | कोयनेचे दरवाजे दहा फुटांवर

कोयनेचे दरवाजे दहा फुटांवर

googlenewsNext

कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास धरणाचे सहा वक्री दरवाजे दहा फुटांवर उघडण्यात आले. त्याद्वारे नदीपात्रात सुमारे ८९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी, नदीचे पाणी पात्राबाहेर शेतात गेले असून, मूळगाव पूल, संगमनगर जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तर नेरळे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात पुन्हा पूरस्थिती निर्माण होणार का, अशी भीती आहे.
कोयना धरणाच्या सहा वक्री दरवाजांपैकी दोन दरवाजांतून दीड फुटाने सुरू असलेला विसर्ग मंगळवारी रात्री पुन्हा दोन फुटांवर करत सहा वक्री दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला. बुधवारी सकाळी सात वाजता धरणातील पाण्याची आवक वाढल्याने दरवाजे तीन फूट करण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता धरणातील पाण्याची आवक ८६ हजार ५५७ क्युसेक झाल्याने सहावक्री दरवाजे सहा फुटांवर नेण्यात आले. आणि विसर्ग ५६ हजार ३७२ करण्यात आला. त्यानंतर साडेअकरा वाजता धरणाचे दरवाजे आठ फुटांवर करण्यात आले. त्याद्वारे नदीपात्रात ७३ हजार ६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने कोयना नदीचे पाणी सखल भागात पसरले. तर सायंकाळी मूळगाव पूल पाण्याखाली गेला. संगमनगर जुना पूलही पाण्याखाली गेला असून, विसर्ग वाढल्यास मोरगिरी भागाला जोडणारा नेरळे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाटण तालुक्यात चाकरमान्यांची संख्या मोठी असून, ही मंडळी गणपतीसाठी गावाकडे आली आहेत. तर काही येणार आहेत. ऐन गणेशोत्सव काळात पुरामुळे उत्साहाचा हिरमोड होण्याची शक्यता झाली आहे. पावसाचा जोर वाढत आहे. आणि धरणातील विसर्ग मोठा झाल्याने पूररेषेतील गावातील ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर व आवक वाढत गेल्याने विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
सायंकाळी पाच वाजता पाणीपातळी २१६३.०१ फूट होती. धरणातील पाण्याची आवक ८२४२९ क्युसेक असून विसर्ग ७२ हजार ३९८ क्युसेक आहे. धरणात १०४.७२ टीएमसी पाणीसाठा आहे. गत चोवीस तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयना ११९ मिलिमीटर (एकूण ६००४), नवजा १९१ मिलिमीटर (६७८३), महाबळेश्वर १६६ (६०७७) एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Coin doors ten feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.