कोयनेचे दरवाजे साडेपाच फुटांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 02:18 PM2019-09-07T14:18:28+5:302019-09-07T14:19:31+5:30
कोयना धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर उचलून धरणपात्रात ४९ हजार ८0४ मिली मीटर पावसाचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. तसेच धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने कृष्णा, कोयना, वेण्णा, तारळी, उरमोडी या नद्यांना पूर आला आहे.
सातारा : कोयना धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर उचलून धरणपात्रात ४९ हजार ८0४ मिली मीटर पावसाचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. तसेच धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने कृष्णा, कोयना, वेण्णा, तारळी, उरमोडी या नद्यांना पूर आला आहे.
कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. शुक्रवारी आठ वाजेपर्यंत कोयना धरण परिसरात ८७ मिली मीटर पाऊस झाला.
धोम धरणातून ४४. ५९ क्युसेक, कण्हेरमधून ५१.0९ क्युसेक, उरमोडीतून १,४३६ क्युसेक, बलकवडीतून २,१८३ क्युसेक, तारळीमधू १,0१८ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.
धरणांतील पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रातील पाणी काठावरील सखल भागात पसरत असल्याने या भागात राहणाऱ्यांना स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे.
गुरुवारी सकाळी ८ ते शुक्रवारी सकाळी ८ या चोवीस तासांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण १ हजार २५४ मिली मीटर पाऊस झाला.
जिल्ह्यात आजअखेर १६ हजार ४0९ मिली मीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पडलेला पाऊस मिली मीटरमध्ये असा : महाबळेश्वर १२३.८८, सातारा ११.४३, जावळी २९.१२, पाटण २२.७३, कऱ्हाड ९.४६, कोरेगाव २.६७, खटाव १.९७, खंडाळा 0.५५, वाई ४.२९.