कोयनेचे दरवाजे पाच फुटांवर, विसर्ग कमी : पश्चिम भागात पाऊस सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:47 PM2019-09-09T12:47:27+5:302019-09-09T12:48:45+5:30
पश्चिम भागात पाऊस सुरूच असून विसर्ग कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पाच फुटापर्यंत खाली आणण्यात आले. त्यामधून ४५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सातारा : पश्चिम भागात पाऊस सुरूच असून विसर्ग कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पाच फुटापर्यंत खाली आणण्यात आले. त्यामधून ४५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम भागात सतत पाऊस सुरू आहे. तसेच धरण क्षेत्रातही पावसाचा जोर राहिला. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
परिणामी पुन्हा एकदा पुराची स्थिती निर्माण होणार की काय अशी स्थिती होती. पण, सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे तुर्तास तरी पुराची स्थिती टळली आहे. तरीही पाऊस सुरूच असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पण, सध्या हा विसर्ग कमी झालाय.
कोयना धरणाचे दरवाजे रविवारी दिवसभर आठ फुटांपर्यंत होते. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास सहा फुटापर्यंत खाली घेण्यात आले. सध्या धरणात येवा कमी झाल्याने सोमवारी सकाळी दरवाजे पाच फुटापर्यंत खाली घेण्यात आले. त्यातून ४५ हजार २६७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणातील साठा १०३.८ टीएमसी ऐवढा आहे.