कोयनेतून विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 04:55 PM2019-09-23T16:55:06+5:302019-09-23T16:56:01+5:30

कोयना धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दोन दरवाजे एक फुटांनी उचलून विसर्ग करण्यात येत आहे. सकाळी आठच्या सुमारास धरणात १०५ टीएमसी इतका पाणीसाठा होता. पश्चिम भागात गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. सध्याही पावसाची उघडझाप सुरू आहे.

Coincidence begins | कोयनेतून विसर्ग सुरूच

कोयनेतून विसर्ग सुरूच

googlenewsNext
ठळक मुद्देकोयनेतून विसर्ग सुरूचपश्चिम भागात गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस सुरू

सातारा : कोयना धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दोन दरवाजे एक फुटांनी उचलून विसर्ग करण्यात येत आहे. सकाळी आठच्या सुमारास धरणात १०५ टीएमसी इतका पाणीसाठा होता.
पश्चिम भागात गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. सध्याही पावसाची उघडझाप सुरू आहे.

कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली भागात अधून मधून जोरदार सरी पडतात. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होते. त्यातच धरण भरल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करण्यात येतो.

रविवारी सकाळपर्यंत धरणाचे सहा दरवाजे एक फुटावर होते. मात्र, आवक कमी झाल्याने आठच्या सुमारास फक्त दोन दरवाजे एक फुटांवर ठेवून विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या धरणात १५३२ क्यूसेक आवक होत आहे. तर ५२३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.
 

Web Title: Coincidence begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.