घरात ठणठणाट अन् दारात पाण्याचे पाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:43 AM2021-09-25T04:43:04+5:302021-09-25T04:43:04+5:30

सातारा : अनेक प्रयत्न करूनही सदर बझार येथील मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती जीवन प्राधिकरणला थांबवता आली नाही. त्यामुळे घरात ...

Cold water in the house! | घरात ठणठणाट अन् दारात पाण्याचे पाट!

घरात ठणठणाट अन् दारात पाण्याचे पाट!

Next

सातारा : अनेक प्रयत्न करूनही सदर बझार येथील मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती जीवन प्राधिकरणला थांबवता आली नाही. त्यामुळे घरात पाण्याचा ठणठणात तर दारात पाणीचपाणी अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे.

सदर बझार परिसराला जीवन प्राधिकरणकडून कृष्णा उद्भव योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. येथील मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे या भागात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. जीवन प्राधिकरणकडून दोन महिन्यांत तब्बल तीन वेळा रस्त्यात खोदकाम करून जलवाहिनीची गळती थांबविण्यात आली. मात्र, काही दिवसांत परिस्थिती जैसे थे होत आहे. तीनच दिवसांपूर्वी प्राधिकरणकडून गळती काढण्यात आली. मात्र, दुस-या दिवशी रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

परिसरातील नाले व गटारातील सांडपाणी पिण्याच्या पाण्याच मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील गंभीर बनू लागला आहे. त्यामुळे सातत्याने खोदकाम करून वेळ व पैसा वाया घालवण्याऐवजी जीवन प्राधिकरणने संपूर्ण जलवाहिनी बदलून टाकावी, अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.

फोटो : २४ जावेद खान

सदर बझार येथील जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, पाण्याचा अपव्यय सुरू आहे. (छाया : जावेद खान)

Web Title: Cold water in the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.