महाबळेश्वर हिल स्टेशनवरुन तीन टन कचरा गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 10:49 AM2017-10-31T10:49:47+5:302017-10-31T10:57:17+5:30

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा स्वच्छता विभाग व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने महाबळेश्वर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे तीन टन कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत शेकडो झोपडपट्टी रहिवाशी सहभागी झाले. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

Collect three tons of garbage from Mahabaleshwar Hill Station | महाबळेश्वर हिल स्टेशनवरुन तीन टन कचरा गोळा

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा स्वच्छता विभाग व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने महाबळेश्वर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे तीन टन कचरा गोळा करण्यात आला.

Next
ठळक मुद्देमहाबळेश्वर व परिसरात स्वच्छता मोहीम महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषद व झोपडपट्टी सुरक्षा दलाचा उपक्रम

महाबळेश्वर , दि. ३१:  महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा स्वच्छता विभाग व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने महाबळेश्वर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे तीन टन कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत शेकडो झोपडपट्टी रहिवाशी सहभागी झाले. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.


मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन करून करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, नगरसेवक कुमार शिंदे, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे तालुकाध्यक्ष हृषिकेश वायदंडे उपस्थित होते.


महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दल व महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सहकार्याने महाबळेश्वरमधील द क्लबपासून वेण्णालेक या तीन किमी च्या मुख्य रस्ता तसेच महाबळेश्वरमध्ये नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेकच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. वेण्णालेकवर असलेले विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल्स व त्यामागील बाजूस असलेल्या संपूर्ण परिसर स्वच्छ केला.


नगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे सर्वच साहित्य देण्यात आले होते. यावेळी नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक बबन जाधव, अरुण वायदंडे, मनोज चव्हाण, हशम वारुणकर, अयुब वारुणकर, महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या सदस्या अनिता वरपे, योगिता आगवणे, सुवर्णा जाधव, मीनाक्षी चव्हाण, शीतल इटे, गौतम जाधव, जयश्री वागमारे, रेणुका कांबळे, विमल वायदंडे, दैवशीला गायकवाड, मंगल वायदंडे, सीमा सकटे तसेच वसंत वायदंडे, शुभम खरे, अनिकेत मोरे, सागर कांबळे, बाबू कांबळे, गणेश मोरे, वैभव खंडझोडे, हर्षद वायदंडे, नारायण भट आदी उपस्थित होते.

 

Web Title: Collect three tons of garbage from Mahabaleshwar Hill Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.