चोराडेत विनाकारण फिरणाऱ्यांकडून दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:16+5:302021-06-09T04:48:16+5:30

पुसेसावळी : सातारा जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर होत चालल्यामुळे लॉकडाऊनचे नियम अधिक कडक झाल्याने चोराडे येथील चोराडे फाट्यावर नाकाबंदी ...

Collection of fines from unwarranted peddlers | चोराडेत विनाकारण फिरणाऱ्यांकडून दंड वसूल

चोराडेत विनाकारण फिरणाऱ्यांकडून दंड वसूल

Next

पुसेसावळी : सातारा जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर होत चालल्यामुळे लॉकडाऊनचे नियम अधिक कडक झाल्याने चोराडे येथील चोराडे फाट्यावर नाकाबंदी करण्यात आली असून, अत्यंत आवश्यक कारणानेच बाहेर पडणाऱ्याला सूट देण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा धडाका पुसेसावळी पोलिसांनी सुरू केला आहे.

चोराडेसह परिसरातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा सर्वांना विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे या ठिकाणी सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनाबरोबर या परिसरातील वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. संचारबंदीच्या कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीस कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. दुकानमालकांनी व दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी लसीकरण व तपासणी करून घेणे बंधनकारक असून, दुकानमालकांनी सुरक्षिततेची काळजी घेऊन उपाययोजना करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

या वेळी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्याकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

Web Title: Collection of fines from unwarranted peddlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.