Crime News: साताऱ्यात भीक मागणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 04:09 PM2022-04-25T16:09:45+5:302022-04-25T16:10:49+5:30

‘तुला व तुझ्या मुलीला घरी सोडतो,’ असे म्हणून दोघींना दुचाकीवर बसविले. त्यानंतर ते दुचाकीवरून घरी निघाले. मात्र, निर्जन ठिकाणी पीडित महिलेवर सामुहिक अत्याचार केला.

Collective atrocities on a begging woman in Satara, Four arrested | Crime News: साताऱ्यात भीक मागणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, चौघांना अटक

Crime News: साताऱ्यात भीक मागणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, चौघांना अटक

Next

सातारा : शहर व परिसरात भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेवर दोघांनी सामुहिक अत्याचार तर दोघांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी काही तासांतच चौघांना अटक केली असून, ही घटना दि. २३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जैतापूर, ता. सातारा गावच्या पुलाजवळ निर्जन ठिकाणी घडली.

नम्या यंत्र्या भोसले (रा. फडतरवाडी, ता. सातारा), किरडेट आशिर्वाद पवार (रा. गोगावलेवाडी, ता. कोरेगाव), भगत काप्या काळे (रा. बारटक्के चौक, सातारा), मयूर नागेश काळे (रा. फडतरवाडी, ता, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरामध्ये भीक मागत असलेली २५ वर्षीय महिला शनिवारी (दि.२३) सायंकाळी पाच वाजता तिच्या लहान मुलीसमवेत रहिमतपूर रस्त्यावर उभी होती. यावेळी संशयित हे दोन दुचाकीवरून तेथे आले. ‘तुला व तुझ्या मुलीला घरी सोडतो,’ असे म्हणून दोघींना दुचाकीवर बसविले. त्यानंतर ते दुचाकीवरून घरी निघाले. मात्र, जैतापूर गावच्या हद्दीतील पुलाजवळ आल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबविली.

पीडित महिलेला ओडत रस्त्याच्याकडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली नेले. येथे नम्या भोसले आणि मयूर काळे या दोघांनी त्या महिलेवर सामुहिक अत्याचार केला. तर किरडेट पवार आणि भगत काळे यांनी त्या महिलेसोबत अश्लील कृत्य केले. हा प्रकार कोणाला सांगितलास तर जीवे ठार मारेन, अशी तिला धमकी दिली.

या प्रकारानंतर संबंधित पीडित महिला आणि तिच्या मुलीला तिच्या घराजवळ सोडण्यात आले. यानंतर संबंधित संशयित तेथून पसार झाले. परंतु पीडित महिलेने या प्रकाराची सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून काल, रविवारी रात्री चारही संशयितांना अटक केली. महिला पोलीस उपनिरीक्षक डी. डी. मुसळे या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Collective atrocities on a begging woman in Satara, Four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.