कर्नल आर.डी. निकम सैनिक बँकेचा ३६वा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:39 AM2021-01-23T04:39:31+5:302021-01-23T04:39:31+5:30

सातारा : सैनिकांनी सर्वांसाठी सुरू केलेली कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक ही सर्व सभासद, ग्राहक आणि हितचिंतकाच्या ...

Colonel R.D. 36th Anniversary of Nikam Sainik Bank | कर्नल आर.डी. निकम सैनिक बँकेचा ३६वा वर्धापनदिन

कर्नल आर.डी. निकम सैनिक बँकेचा ३६वा वर्धापनदिन

googlenewsNext

सातारा : सैनिकांनी सर्वांसाठी सुरू केलेली कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक ही सर्व सभासद, ग्राहक आणि हितचिंतकाच्या प्रेमाच्या व विश्वासाच्या बळाबर आपल्या बँकिंग सेवेची ३६ वर्षे पूर्ण करून २३ जानेवारी रोजी ३७व्या वर्षांत पदार्पण करत आहे. आजी-माजी सैनिकांसह सर्वसामान्यांची अर्थवाहिनी असलेल्या सैनिक सहकारी बँकेची स्थापना कर्नल आर. डी. निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे आाैचित्य साधून २३ जानेवारी १९८५ रोजी केली. बँकेच्या ३६व्या वर्धापनदिनानिमित्त...

सैनिक शिस्तीचे वळण सहकार चळवळीला लाभावे, ही एक सार्वजनिक गरज निर्माण झाली होती आणि नेमका तोच विचार घेऊन कर्नल आर. डी. निकम यांनी सैनिक सहकारी स्थापना केली. आज सहकारी बँकांना अतिशय कठीण अशा कालखंडातून प्रवास करावा लागत आहे. तसेच सारे विश्व एका गोंधळलेल्या अवस्थेतून जात असताना सहकार क्षेत्र डबघाईला आले असताना कर्नल आर.डी. निकम सैनिक सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन कॅप्टन उदाजी निकम यांच्या नेतृत्वाखाली शहरी व ग्रामीण भागात बँक आपले अस्तित्व टिकवून आहे, ही खऱ्या अर्थाने कर्नल साहेबांंना शताब्दी वर्षाची आदरांजली ठरली आहे. (वा.प्र.)

फोटो आहे...

२२कॅप. निकम (एडीव्हीटी)

Web Title: Colonel R.D. 36th Anniversary of Nikam Sainik Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.