रंगीत टोप्या बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:35+5:302021-03-07T04:35:35+5:30
रंगीत टोप्या बाजारात सातारा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या ...
रंगीत टोप्या बाजारात
सातारा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या रंगीत टोप्या दाखल झाल्यासाठी आहेत. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी टोप्या विक्रीसाठी आल्या आहेत. या रंगीबेरंगी टोप्यांना ग्राहकांमधनू चांगली मागणी असल्याचे चित्र शहर व परिसरात पहावयात मिळत आहे.
स्कूल बसचालक आर्थिक संकटात
सातारा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यातील शाळा व विद्यालये पुन्हा बंद झाली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांवर अवलंबून असलेले स्कूल बसचालक सध्या आर्थिक संकटात सापडले असून, बसचा हप्ता व कुटुंबाचा चरितार्थ कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे.
साईराज काटेचे यश
सातारा : विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छत्रपती शाहू अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेजमधील अकरावीत शिकणारा विद्यार्थी साईराज काटे याने वारली येथे झालेल्या नेमबाजी स्पर्धेत दोन सुवर्ण आणि कांस्यपदक पटकावले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
लसीकरण नोंदणीस प्रारंभ
सातारा : गोवे, ता. सातारा येथील ग्रामपंचायत कार्यालयात ६० वर्षांवरील ग्रामस्थांची कोविडवरील व्हॅक्सिनसाठी नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंडलाधिकारी प्रभाकर कुलकर्णी, सरपंच विवेक जाधव, उपसरपंच कविता जाधव, सचिन जाधव, पोलीसपाटील गजानन चवरे, आशा जाधव, ग्रामविकास अधिकारी आर. बी. होवाळ, तलाठी सयाजी सावंत उपस्थित होते.
‘जिजामाता’ येथे कार्यक्रम
सातारा : येथील जिजामाता अध्यापिका विद्यालयात विविध कार्यक्रम पार पडले. त्यावेळी डॉ. व्ही. बी. सलगर यांचे विज्ञान आज, काल आणि उद्या या विषयावर व्याख्यान झाले. तसेच संत गाडगेबाबा व विज्ञान या विषयावर प्राचार्य डी. व्ही. धनवडे यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य विश्रांती कदम यांनी कौतुक केले. प्रा. डॉ. तुषार साळुंखे यांनी आढावा घेतला.
गहू, ज्वारी काढणीस वेग
दहीवडी : माण तालुक्यात रब्बी पीक हंगामातील ज्वारी व गव्हाच्या पिकांची काढणी व मळणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. सध्या गावोगावच्या शेतशिवारात ज्वारीच्या काढणीची कामे मजुरांतर्फे सुरू आहेत. गव्हाची काढणी व मळणीसाठी हरयाणा, मध्य प्रदेश येथून माणदेशामध्ये दाखल झालेल्या हार्वेस्टर या आधुनिक यंत्राच्या साहाय्याने गव्हाच्या पिकाची कापणी व मळणी जलद गतीने होत आहे.