बिरवाडीतील शिवारात पिकणार रंगीबेरंगी भात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:53+5:302021-06-19T04:25:53+5:30

पाचगणी : निळ्या भाताच्या लागवडीनंतर आता महाबळेश्वर तालुक्यात पुन्हा हिरव्या तांबड्या भाताची लागवड झाली आहे. त्यामुळे नेहमीच पांढरा ...

Colorful rice to be grown in Birwadi Shivara! | बिरवाडीतील शिवारात पिकणार रंगीबेरंगी भात !

बिरवाडीतील शिवारात पिकणार रंगीबेरंगी भात !

Next

पाचगणी : निळ्या भाताच्या लागवडीनंतर आता महाबळेश्वर तालुक्यात पुन्हा हिरव्या तांबड्या भाताची लागवड झाली आहे. त्यामुळे नेहमीच पांढरा भात खाणाऱ्या खवय्यांना या निमित्ताने रंगीबेरंगी भाताची चव चाखता येणार आहे. महाबळेश्वर कृषी विभागाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक उभारी नक्की मिळणार आहे.

महाबळेश्वर तालुका शेतीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी नेहमीच अग्रेसर आहे. येथील आल्हाददायक व पोषक वातावरण नेहमीच साद घालत असते. त्यामुळेच तालुका कृषी विभाग शेतकऱ्यांच्या साह्याने येथील शेतीत नवनवीन कृषी उपक्रम राबवित आहे. नुकतीच निळ्या भाताची लागवड बिरमनी येथे करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर हिरव्या, निळ्या भाताची लागवड गादी वाफ्यांच्या माध्यमातून बिरवाडी येथील शेतकरी समीर चव्हाण यांच्या शेतात एसआरटी म्हणजे सगुणा भात तंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब करून कृषी विभागाने या तांबड्या व हिरव्या भाताची लागवड केली आहे.

यावेळी कृषी उपसंचालक विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी वाई, चंद्रकांत गोरड, तंत्र अधिकारी सातारा महामुलकर, कृषी अधिकारी राजेंद्र देशपांडे यांच्या हस्ते हिरव्या भाताची लागवड करण्यात आली. महाबळेश्वर तालुक्यात हिरव्या भात व तांबड्या भाताचे वाण कृषी सहाय्यक दीपक बोर्डे यांनी उपलब्ध करून दिले आहेत..

चौकट :

आरोग्यवर्धक म्हणून ग्रीन टी यास पसंती देत होतो. त्यासोबतीला आता ग्रीन राईस आला आहे. दुसऱ्या बाजूला तांबडा भात या अगोदरच निळा भात आल्याने तर पारंपरिक पांढरा भात आहेच. त्यामुळे आता रंग टाकून भाताला रंगीबेरंगी बनविण्याचे दिवस संपले. आता मूळ रंगाच्या रंगीबेरंगी भाताची न्यारीच चव घेता येणार आहे.

प्रतिक्रिया :

महाबळेश्वर तालुका शेतीच्या नवनवीन प्रयोगांसाठी नेहमीच कौतुक पात्र ठरला आहे. येथील वातावरण सुद्धा पोषक असल्याने कृषी विभाग येथील मिळत्याजुळत्या परिस्थितीचा फायदा घेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. यातून येथील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळेल.

- दीपक बोर्डे, कृषी सहायक महाबळेश्वर.

फोटो १८पाचगणी-राईस

महाबळेश्वर तालुक्यातील बिरवाडी येथील शेतात तांबड्या, हिरव्या भाताची लागवड करण्यात आली. (छाया : दिलीप पाडळे)

Web Title: Colorful rice to be grown in Birwadi Shivara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.