कोरोना काळात रक्तदानासाठी पुढे यावे : लोखंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:50+5:302021-05-01T04:36:50+5:30
मसूर : सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात भासत असलेला रक्ताचा तुटवडा ओळखून येथील युवकांनी घेतलेल्या रक्तदान शिबिरातून जमा झालेले रक्त ...
मसूर : सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात भासत असलेला रक्ताचा तुटवडा ओळखून येथील युवकांनी घेतलेल्या रक्तदान शिबिरातून जमा झालेले रक्त रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत करेल,’ असे प्रतिपादन मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रमेश लोखंडे यांनी केले.
किवळ येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवक राष्ट्रवादी काँग्रेस किवळ व श्री दत्त किकेट क्ल्ब किवळ यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विजयकुमार साळुंखे, उपजिल्हा रुग्णालयाचे रक्तसंकलन अधिकारी उपस्थित होते.
लोखंडे म्हणाले, ‘या महामारीच्या काळात येथील चाळीस ते पन्नास युवकांनी एकत्र येऊन काळाची गरज ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. या युवकांचा इतरांनीही आदर्श घेऊन रक्तदान शिबिर किंवा महामारीच्या काळातील गरजा ओळखून कार्य करावे.’
शिबिराचे उदघाटन आशा स्वयंसेविका विमल जाधव, कुंदा साळुंखे, सीमा कांबळे यांनी केले.
चेतन साळुंखे यांनी आभार मानले.
शिबिर यशस्वीतेसाठी महेश साळुंखे, योगेश साळुंखे, राजेंद्र थोरात, सुरज नळगुणे, संदीप पुजारी, गणेश साळुंखे, वैभव पुजारी, संग्राम मुळीक, अक्षय साळुंखे, आदित्य साळुंखे, संकेत साळुंखे, विजय चव्हाण, अभिषेक पावशे, निखिल साळुंखे, शैलेश मुळीक, शिवम साळुंखे, विराज साळुंखे, अतुल साळुंखे, तेजस पवार, अथर्व साळुंखे, राज साळुंखे, अनिमेश साळुंखे, गणेश काशीद, रोहित पुजारी, मंगेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.