लोकमत आयोजित रक्तदान शिबिर दिलासा देणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:47 AM2021-07-07T04:47:45+5:302021-07-07T04:47:45+5:30

सातारा : ‘सध्याच्या काळात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशावेळी ‘लोकमत’ समूहाच्या वतीने आयोजित केलेले हे रक्तदान शिबिर लोकांसाठी ...

Comforting blood donation camp organized by Lokmat | लोकमत आयोजित रक्तदान शिबिर दिलासा देणारे

लोकमत आयोजित रक्तदान शिबिर दिलासा देणारे

Next

सातारा : ‘सध्याच्या काळात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशावेळी ‘लोकमत’ समूहाच्या वतीने आयोजित केलेले हे रक्तदान शिबिर लोकांसाठी दिलासा देणारे ठरले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताची गरज पडत आहे. लोकांनी पुढे येऊन रक्तदान करावे.’ असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.

‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभर आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोज पठाण यांचा सोमवारी वाढदिवस होता, यानिमित्ताने त्यांनी विलासपूर येथील ग्रामपंचायतीच्या आवारात ‘लोकमत’चे रक्तदान शिबिर आयोजित केले. त्याला स्थानिक जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते ‘लोकमत’चे रक्तदान शिबिर तसेच विलासपूर ग्रामपंचायतीतर्फे आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या, कर्तव्य सोशल ग्रृपच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच विविध उपक्रमांना मदत देखील केली जाते. लोकमतच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदानाचा उपक्रम हा खरोखरच स्तुत्य आहे. त्यामुळे यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन अनेकांनी जीवदान देण्यासाठी सहकार्य करावे.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी फिरोज पठाण, बाळासाहेब महामुलकर, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण यांच्यासह कर्तव्य सोशल ग्रुपचे पदाधिकारी व फिरोज पठाण मित्र समूहाने परिश्रम घेतले. अक्षय ब्लड बँकेचे सतीश साळुंखे आणि त्यांच्या टीमने देखील सकाळपासूनच रक्तदान माेहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

यांनी केले रक्तदान

‘ए’ पॉझिटिव्ह

वेदांतिकाराजे भोसले, तानाजी सावंत, संभाजी मुळीक, आकाश घोलप, फिरोज नायकवडी, परवेझ पठाण, अमय नामदास, सोहेल सय्यद, राम गुरव, अभिजित चव्हाण, रवींद्र जाधव.‘

बी’ पॉझिटिव्ह

नितीन भोसले, ओम राजेशिर्के, स्वप्नील पवार, रवींद्र धनावडे, शुभम पानसकर, राहुल पवार, रणजित कांबळे, शुभम धुमाळ, चंद्रकांत घाडे,

एबी पॉझिटिव्ह

अनिल ढवळे, महेश गुजर

ओ पॉझिटिव्ह

समर्थ लेंभे, अश्पाक सय्यद, ओंकार जाधव, समीर शिंदे, रजत खैरनार, तानाजी भिसुरे, सलाउद्दीन मुल्ला, बळीराम भाजणे, चंदू भूगोल, शैलेश काळंगे, तुषार गायकवाड, अनिकेत जगताप, अर्जुन पवार, चंद्रकांत भोसले, अतुल टोपे, प्रथमेश यादव, संकेत जमदाडे.

चौकट..

वेदांतिकाराजेंनीही केले रक्तदान

कर्तव्य साेशल ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष वेदांतिकाराजे भोसले यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. असे उपक्रम राबविण्याबाबत त्यांची ख्याती आहे. ‘लोकमत’च्या रक्तदान मोहिमेत वेदांतिकाराजे यांनी स्वत: रक्तदान केले तसेच महिला व नागरिकांनादेखील रक्तदान करण्याचे आवाहन केले. हे त्यांचे ४८वे रक्तदान ठरले. दर तीन महिन्यांनी त्या रक्तदान करत असतात.

फोटो ओळ : ‘लोकमत’तर्फे फिरोज पठाण मित्र समूहाच्या सहकार्याने विलासपूर ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी फिरोज पठाण, बाळासाहेब महामुलकर, फिरोज पठाण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो नेम : ०५लोकमत

Web Title: Comforting blood donation camp organized by Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.