Mahabaleshwar Hill Station Satara- महाबळेश्वरला सहलीसाठी येणे मुंबईकरांना महागात पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 11:25 AM2021-04-26T11:25:38+5:302021-04-26T11:32:44+5:30

Mahabaleshwar Hill Station Satara : जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणाऱ्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजाराचा दंड शुक्रवारी वसुल केला.

Coming to Mahabaleshwar for a trip cost Mumbaikars dearly | Mahabaleshwar Hill Station Satara- महाबळेश्वरला सहलीसाठी येणे मुंबईकरांना महागात पडले

Mahabaleshwar Hill Station Satara- महाबळेश्वरला सहलीसाठी येणे मुंबईकरांना महागात पडले

Next
ठळक मुद्देजिल्हाबंदी आदेश भंग : पर्यटकांकडून ५५ हजारांचा दंड वसूल महाबळेश्वरला सहलीसाठी येणे मुंबईकरांना महागात पडले

महाबळेश्वर : जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणाऱ्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजाराचा दंड शुक्रवारी वसुल केला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकाने राज्यात लॉकडाउन जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्हयाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक कामासाठीच जिल्ह्याची सीमा ओलांडण्याची मुभा दिली जात आहे परंतु सहलीसाठी जिल्हा बंदी मोडणे मुंबईतील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे.

मुंबईच्या पर्यटकांनी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर महाबळेश्वरच्या सहलीचा बेत आखला. त्यांनी यासाठी महाबळेश्वर येथील हॉटेल लि मेरिडीयनमधील रूम ऑनलाईन बुक केल्या. ठरल्याप्रमाणे पर्यटक शुक्रवारी अनेक जिल्हयाच्या सीमा ओलांडून महाबळेश्वरात दाखल झाले. हे पर्यटक शुक्रवारी सायंकाळी येथील नाक्यावर आले असता त्यांनी हॉटेल बुकिंग असल्याचे सांगून शहरात प्रवेश केला.

ही माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना मिळाली. त्यांनी पर्यटकांच्या शोधासाठी तातडीने पथक रवाना केले. या विशेष पथकाने पर्यटकांची एक गाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पकडली. तर इतर दोन गाडया हॉटेलच्या प्रवेशव्दारावर पकडल्या. अधिक चौकशी केली असता पर्यटकांनी जिल्हा बंदी आदेश मोडल्याचे पथकातील अधिकारी यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना सर्व हकिकत सांगितली.

मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष पथकाने पर्यटकांच्या प्रत्येक वाहनास दहा हजार तर या पर्यटकांना हॉटेलमध्ये प्रवेश दिल्याबद्द्ल हॉटेल व्यवस्थापनास २५ हजार रूपये दंड आकारला. या कारवाईत विशेष पथकाने ५५ हजाराचा दंड वसूल केला.

Web Title: Coming to Mahabaleshwar for a trip cost Mumbaikars dearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.