तांबवेत यांत्रिक भातलागणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:25 AM2021-06-28T04:25:42+5:302021-06-28T04:25:42+5:30

जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रांताधिकारी उत्तम दिघे, जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी ...

Commencement of mechanical fermentation in copper | तांबवेत यांत्रिक भातलागणीस प्रारंभ

तांबवेत यांत्रिक भातलागणीस प्रारंभ

Next

जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रांताधिकारी उत्तम दिघे, जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तहसीलदार अमरदीप वाकडे, सरपंच शोभाताई शिंदे, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक हणमंतराव चव्हाण, कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील, लक्ष्मण देसाई, उपसरपंच अ‍ॅड. विजयसिंह पाटील, नवनाथ पालेकर, सचिन पवार यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

कृषी सहायक आबासाहेब कुंभार यांनी बीजप्रक्रिया, पर्यवेक्षक अशोक कोळेकर यांनी अमिनो अ‍ॅसिड तयार करणे व सुपरकेन नर्सरी, मेहमूद शेख यांनी यांत्रिकीकरण भातलागवड, विनोद पुजारी यांनी रोजगार हमी योजना व फळबागलागवड याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व स्वागत तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांनी केले, तर आभार अ‍ॅड. विजयसिंह पाटील यांनी मानले.

फोटो : २७केआरडी०२

कॅप्शन : तांबवे, ता. कऱ्हाड येथे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत यांत्रिक पद्धतीने भातलागण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

Web Title: Commencement of mechanical fermentation in copper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.