राजमाची पाझर तलावाच्या दुरुस्तीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:34 AM2021-03-15T04:34:48+5:302021-03-15T04:34:48+5:30

सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी ३४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यावेळी वनवासमाचीचे ...

Commencement of repair of Rajmachi Pazhar Lake | राजमाची पाझर तलावाच्या दुरुस्तीला प्रारंभ

राजमाची पाझर तलावाच्या दुरुस्तीला प्रारंभ

Next

सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी ३४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यावेळी वनवासमाचीचे सरपंच महिपती माने, प्रल्हाद डुबल, दादासाहेब जाधव, माणिकराव माने, विश्वासराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, सुर्ली घाटाच्या पायथ्याला असणाऱ्या या राजमाची पाझर तलावामुळे परिसरातील शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. तसेच डोंगर कपारीत असलेल्या या तलावाचा सर्वांत जास्त फायदा वन्यजीवांना होतो. १९७२ च्या सुमारास हा तलाव बांधण्यात आला. काही वर्षांपासून तलावाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पावसाळ्यात ओसंडून वाहणारा हा तलाव उन्हाळ्यात मात्र कोरडा पडतो. त्यामुळे या तलावाची दुरुस्ती करणे गरजेचे झाले होते. दुरुस्तीसाठी सुमारे 34 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार या तलावाची मुख्य भिंत व सांडव्याची मजबुती करण्यात येणार आहे.

आनंदराव माने, प्रशांत यादव, बाळासाहेब सूर्यवंशी, कल्याण डुबल, पराग रामुगडे, जगन्नाथ काळे, अवधूत डुबल, सर्जेराव पानवळ, निवास डुबल, मनोज माने, धनाजी माने, मुरारजी माने, मिलिंद सुर्वे, मुरलीधर कांबळे, भागवत कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

- चौकट

...असे होणार मजबुतीचे काम

दरम्यान, गळती काढण्यासाठी पाच ते दहा मीटर खोल खडक लागेपर्यंत चर खोदण्यात येणार आहे. पॉलिथिन कागद बसविण्यात येणार आहे. त्यावर पुन्हा दगडी पिचिंग करण्यात येणार आहे. काम चांगल्या प्रकारे होण्यासाठी शेतकरी व ग्रामस्थांनी त्याठिकाणी लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Commencement of repair of Rajmachi Pazhar Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.