जुना आरटीओ ते पारंगे चौक रस्त्याच्या कामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:01+5:302021-01-09T04:32:01+5:30
करंजे : शहरातील जुना आरटीओ चौक ते पारंगे चौक रस्त्याचे काम गुरुवारी सकाळी करण्यात आले. पण, या रस्त्यावर मातीमिश्रित ...
करंजे : शहरातील जुना आरटीओ चौक ते पारंगे चौक रस्त्याचे काम गुरुवारी सकाळी करण्यात आले. पण, या रस्त्यावर मातीमिश्रित खडी टाकल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. चालकांच्या वाहन चालविताना डोळ्यांत धूळ जात असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
भर दिवसात वाहनाचे दिवे लावून वाहन चालवावे लागत आहे. गुरुवारी दिवसभरात कमीत कमी आठ-दहा वाहने मातीमिश्रित खडीवरून घसरण्याचे प्रकार घडले आहेत. जो काही रस्ता तयार करण्यात आला आहे, त्याच्या आजूबाजूला बरीच दुकाने व घरे आहेत. त्यामुळे रस्त्यावरील उडणारी धूळ दुकानात आणि घरात जात असल्याने व्यापारी आणि घरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. नागरिक या प्रकारामुळे फार त्रस्त असून, रस्त्याच्या कामाबद्दल ही संशकता निर्माण होत आहे. काम नक्कीच डांबरीकरणाचे झाले आहे की मातीमिश्रित खडीपासून केले आहे हे मात्र समजेनासे झाले आहे. या मोठ्या प्रमाणात उडत असलेल्या धुळीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फोटो..
०७करंजे
सातारा शहरातील जुना आरटीओ चौक ते पारंगे चौक रस्त्याचे काम गुरुवारी सकाळी करण्यात आले. पण, या रस्त्यावर मातीमिश्रित खडी टाकल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. (छाया : किरण दळवी)