फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:35 AM2021-01-18T04:35:31+5:302021-01-18T04:35:31+5:30

फलटण : गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या फलटण-पंढरपूर या बहुचर्चित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. सुमारे ...

Commencement of survey of Phaltan-Pandharpur railway line | फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास प्रारंभ

फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास प्रारंभ

Next

फलटण : गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या फलटण-पंढरपूर या बहुचर्चित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. सुमारे १ हजार ४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात केंद्र सरकारचा ७०० तर राज्य सरकारचा ७०० कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे. राज्य शासनाने निधीसाठी हिरवा कंदील दाखविल्यास हा प्रकल्प पूर्णत्वास येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

फलटणची रेल्वे हा खरेतर तालुक्यातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. माजी खासदार दिवंगत हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी लोणंद फलटण बारामती रेल्वेमार्गासाठी प्रचंड संघर्ष केला. त्यांच्या माध्यमातून लोणंद ते फलटण रेल्वे मार्ग तयार झाला. त्यानंतर माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून लोणंदहून फलटणला प्रत्यक्ष रेल्वे सुरू झाली. परंतु फलटणहून पुढे रेल्वे अद्याप कुठेच धावू शकली नाही. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला. त्याचेच फलित म्हणून या रेल्वे मार्गासाठी सुमारे १ हजार ४०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करून त्यास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये केंद्राने ७०० व राज्य सरकारने ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करावी, असे प्रयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, रेल्वेच्या बांधकाम विभागाने तातडीने फलटण-पंढरपूर या रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामुळे हा मार्ग प्रत्यक्षात उतरण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, राज्य सरकारने या मार्गासाठी ७०० कोटींच्या गुंतवणुकीची हमी द्यावी, असे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्य सरकारला दिले आहे. मात्र, अद्याप तरी राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसल्याचे समजते.

(कोट)

फलटण ते पंढरपूर या प्रलंबित रेल्वेमार्गासाठी नव्याने सर्व्हे सुरू झाला आहे. या मार्गासाठी केंद्राने १४ कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्यास मंजुरी दिली आहे. यापैकी केंद्राने ७०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे; परंतु राज्य सरकारने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. वारकरी आणि विठ्ठलभक्त असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या हिश्श्याचा भार उचलावा.

- रणजितसिंह नाईक-निंबाळकर,

खासदार (माढा)

फोटो : रेल्वे मार्गाचा फोटो

Web Title: Commencement of survey of Phaltan-Pandharpur railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.