नीरा-देवघर प्रकल्पाच्या वितरिकांच्या कामास प्रारंभ....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:47+5:302021-07-18T04:27:47+5:30
खंडाळा : नीरा-देवधर प्रकल्पाच्या भोळी-शेखमिरवाडी हद्दीतील वितरिकांच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. या वितरिकांमधून दोन्ही गावांतील सुमारे १००० ...
खंडाळा : नीरा-देवधर प्रकल्पाच्या भोळी-शेखमिरवाडी हद्दीतील वितरिकांच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. या वितरिकांमधून दोन्ही गावांतील सुमारे १००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
या सर्व वितरिका बंदिस्त पाईपलाईनद्वारे करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले. यावेळी वितरिकांच्या कामासंबंधी शेतकऱ्यांच्या इतर अडचणीसंबंधी चर्चा करून त्या सोडविण्याचे ठरविण्यात आले. या कामातून शेखमिरवाडीमधील सुमारे ३६९ हे., तर भोळीमधील ६१२ हे. शेतजमिनीला पाणी मिळणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव डॉ. विजय शिंदे, प्रकल्प अधिकारी पांडुरंग कांजळकर, गजाऩन अंबलवाड, सुजित कर्णे, भोळीचे सरपंच प्रशांत खुंटे, उपसरपंच महेश चव्हाण, शेखमिरवाडीच्या सरपंच सुनीता शेडगे, उपसरपंच विशाल शिंदे, हरिश्चंद्र लिमण, विश्वास चव्हाण, अनंतराव चव्हाण, सतीश शिंदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
.......................................