मुंबईकर तरुणांची बांधिलकी स्तुत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:24 AM2021-07-09T04:24:50+5:302021-07-09T04:24:50+5:30

शेंद्रे : ‘मुंबईकर तरुणांची गावाविषयी असणारी ओढ ही सतत कायम असते. शरीराने जरी ते मुंबईत असले तरी मनाने ते ...

Commendation of the commitment of Mumbaikar youth | मुंबईकर तरुणांची बांधिलकी स्तुत्य

मुंबईकर तरुणांची बांधिलकी स्तुत्य

Next

शेंद्रे : ‘मुंबईकर तरुणांची गावाविषयी असणारी ओढ ही सतत कायम असते. शरीराने जरी ते मुंबईत असले तरी मनाने ते गावाकडेच असतात. गावासाठी त्यांनी दाखवलेली बांधिलकी कोैतुकास्पद आहे,’ असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

सातारा तालुक्यातील कोैंदणी, नरेवाडी येथे मुंबईकर तरुण व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावातील कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. विक्रम पवार, महाराष्ट्र बाजारपेठचे अध्यक्ष कौतिक दांडगे, संजय शिर्के, संदेश शिरसाट, महेश पाटील, प्रभाकर दाते, दीपक बोदडे, जीवन घाडगे, विनोद कदम आदींची उपस्थिती होती.

‘कोरोनाकाळात सर्वांपुढेच अडचणी आल्या. अशा कठीण प्रसंगी मुंबईकर युवकांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांचे हे कार्य मोलाचे आहे,’ असेही आमदार भोसले यांनी सांगितले. दिलीप यादव यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. सरपंच सीमा विजय यादव, उपसरपंच संपत चव्हाण, सदस्य धनश्री माने, अनिल साळुंखे तसेच ग्रामस्थही उपस्थित होते. कार्यक्रमात कोरोना समिती, आशा सेविका, डॉक्टर, ग्रामसेवक तलाठी, पोलीस पाटील आदींचा गोैरव करण्यात आला.

फोटो :

०८शेंद्रे

कोैंदणी (ता. सातारा) येथे जीवनावश्यक साहित्याचे वाटप करताना शिवेंद्रसिंहराजे भोसले. तसेच यावेळी सभापती ॲड. विक्रम पवार व ग्रामस्थ.

Web Title: Commendation of the commitment of Mumbaikar youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.