मुळीकवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध : संजीवराजे निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:42+5:302021-09-25T04:42:42+5:30
आदर्की : ‘मुळीकवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही. परिसरातील बरेच तरुण राजकारणाकडे वळत असून त्यांना विकासाच्या मुख्य ...
आदर्की : ‘मुळीकवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही. परिसरातील बरेच तरुण राजकारणाकडे वळत असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून विधायक स्वरूपाची कामे करून घ्यावीत’, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
मुळीकवाडी, ता. फलटण येथे विविध विकासकामाच्या उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्ता अनपट, पंचायत समितीच्या सदस्या प्रतिभाताई धुमाळ, मुळीकवाडीचे उपसरपंच गणेश कदम उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, ‘मुळीकवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्रपणे सामोरे गेल्याने कोरोना संसर्ग वाढला नाही. त्यामुळे कौतुकास्पद काम केले आहे.’
यावेळी आमदार दीपक चव्हाण, धैर्यशील अनपट, गणेश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी घाडगेमळाचे सरपंच संतोष जगताप, घाडगेवाडीचे उपसरपंच दादासाहेब बोबडे, नामदेव कोळेकर, अंकुश साळुंखे, लहुराज मुळीक, नारायण सपकाळ, नारायण आवटे, यशवंत आवटे, संजय कदम, गणेश पवार, महेश अनपट, सुनील जाधव, ग्रामपंचायत सदस्य रोहित जाधव, सोनाली जाधव, किरण येळे, शिवाजी कदम, धनाजी मोहिते, ग्रामसेविका पी. एस. लंगुटे उपस्थित होते.