रणदुल्लाबादच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध : दीपक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:45 AM2021-09-15T04:45:24+5:302021-09-15T04:45:24+5:30

रणदुल्लाबाद येथे विविध विकासकामांचा शुभारंभ लोकमत न्यूज नेटवर्क पिंपोडे बुद्रुक : ‘कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाने राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच साथ ...

Committed to the overall development of Randullabad: Deepak Chavan | रणदुल्लाबादच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध : दीपक चव्हाण

रणदुल्लाबादच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध : दीपक चव्हाण

Next

रणदुल्लाबाद येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपोडे बुद्रुक : ‘कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाने राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच साथ दिली आहे. या भागाच्या विकासात आम्ही कधीही कमी पडणार नाही. रणदुल्लाबादने जलसंधारणात केलेले काम उल्लेखनीय असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.

रणदुल्लाबाद, ता. कोरेगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व दरे तलाव जलपूजनप्रसंगी आमदार चव्हाण बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष डॉ. लालासाहेब शिंदे, कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, ग्राम गौरव प्रतिष्ठानचे योगेश चव्हाण, प्रशांत बोरावके, सोनके गावचे सरपंच संभाजी धुमाळ, उपसरपंच राहुल धुमाळ, संदीप धुमाळ, धनंजय धुमाळ, तुकाराम पवार, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र जगताप, सरपंच मंगेश जगताप, उपसरपंच सपना ढमाळ, ग्रामपंचायत सदस्या नीता सोनावणे, सुरेश देशमुख, गोवर्धन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

विलास जगताप म्हणाले, ‘रणदुल्लाबाद-सोळशी रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावा. गावात होत असलेल्या कामांबाबत सर्वसामान्य जनता समाधानी आहे.

कार्यक्रमास विजय जगताप, गोरख गायकवाड, महेश यादव, राहुल जगताप, दयानंद जगताप आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक जितेंद्र जगताप यांनी केले. आभार मंगेश जगताप यांनी मानले.

फोटो ओळ : रणदुल्लाबाद, ता. कोरेगाव येथे दरे तलाव जलपूजनप्रसंगी आमदार दीपक चव्हाण, लालासाहेब शिंदे, संजय साळुंखे, जितेंद्र जगताप, मंगेश जगताप, सपना ढमाळ आदी उपस्थित होते. (छाया : संतोष धुमाळ)

Web Title: Committed to the overall development of Randullabad: Deepak Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.