कचरा डेपो विरोधात समिती

By admin | Published: January 27, 2016 10:59 PM2016-01-27T22:59:07+5:302016-01-28T00:29:03+5:30

सातारा तालुका : सोनगावच्या ग्रामसभेत ठराव मंजूर; तीव्र संघर्षाचाही इशारा

Committee against garbage depot | कचरा डेपो विरोधात समिती

कचरा डेपो विरोधात समिती

Next

शेंद्रे : गेली २० वर्षे सोनगाव ग्रामस्थांच्या दृष्टीने संवेदनशील असलेला कचरा डेपोचा विषय गंभीर बनला आहे. त्याच्या विरोधात आंदोलन व तीव्र संघर्षाचा इशारा सोनगाव ग्रामस्थांनी दिला आहे. आंदोलनाबरोबरच न्यायालयीन मार्गानेही कायमचाच प्रश्न
निकाली काढण्याचा ठरावही प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा गावच्या हद्दीत सातारा नगरपरिषदेचा कचरा डेपो आहे. वर्षानुवर्षे या कचरा डेपोचे दुष्परिणाम परिसरातील ग्रामस्थांना भोगावे लागत आहेत. उघड्यावर असणाऱ्या या कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. सद्य:स्थितीत तर डेपोच्या बाहेर रस्त्यापर्यंत कचरा फेकला जात आहे. येथून वाहनारा ओढ्याचा प्रवाह नदीच्या मुख्य
पात्रात मिसळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात गावाला होत
असणाऱ्या पाणीपुरवठ्यातून आरोग्याच्या जटिल समस्या निर्माण होत आहेत.
तसेच पेटवल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड प्रमाणात धूर निर्माण होत आहे. घाणीमुळे बेवारस कुत्र्यांचा प्रचंड प्रमाणात वावर असल्यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. माशांचा प्रादुर्भाव ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
या सर्व घटकांमुळे सोनगाव हद्दीतील हा कचरा डेपो महाभयानक समस्या बनला आहे. मानवी आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या कचरा डेपोच्या विरोधात आता सोनगावकरांनी रस्त्यावर उतरण्याचा नारा दिलेला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्रामसभेत कचरा डेपो विरोधात आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी एक समिती स्थापन केली आहे. त्याच बरोबर समितीसमवेत ग्रामपंचायतीचे सदस्य व गठित केलेली समिती कचरा डेपोविरोधात योग्य ती आंदोलनाची दिशा व कार्यवाही करणार
आहे.
कोणत्याही राजकीय दबाव व भूलथापांना बळी न पडता सनदशीर व कायदेशीर मार्गाने आम्ही आमच्या न्यायहक्कासाठी लढणार आहोत, असा निर्धार सोनगावकर ग्रामस्थांनी केला आहे. (वार्ताहर)

कचरा डेपोमुळे गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्या विरोधात आम्ही आंदोलनाबरोबरच न्यायालयीन मार्गाचाही अवलंब करणार असून, आता माघार नाही. आम्ही या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडेही दाद मागणार आहोत.
- संतोष मुळीक, समिती सदस्य.

Web Title: Committee against garbage depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.