बिलांसाठी वीज वितरण कंपनीचा शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:53 AM2021-02-26T04:53:27+5:302021-02-26T04:53:27+5:30

यावेळी महावितरणचे कऱ्हाड कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नवाळे, शाखा अभियंता यादव, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे, रयत क्रांती संघटनेचे ...

Communication of electricity distribution company with farmers for bills | बिलांसाठी वीज वितरण कंपनीचा शेतकऱ्यांशी संवाद

बिलांसाठी वीज वितरण कंपनीचा शेतकऱ्यांशी संवाद

Next

यावेळी महावितरणचे कऱ्हाड कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नवाळे, शाखा अभियंता यादव, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन नलवडे, माजी सरपंच बाळासाहेब नलवडे, सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद नलवडे, तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव नलवडे, रघुनाथ नलवडे व शेतकरी उपस्थित होते.

कृषिपंप वीज धोरण संकल्पना शेतकऱ्यांपुढे मांडत असताना नवाळे यांनी, शेतकऱ्यांनी आपली शेतीपंपाची बिले वेळेवर भरल्यानंतर जमा होणाऱ्या रकमेचा वापर कृषी ग्राहकांच्या पायाभूत सुविधांसाठी करण्यात येणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी बिल वेळेत भरण्याबाबतचे महावितरणचे धोरण अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर या धोरणाचे शेतकरी स्वागतच करतील, अशी भूमिका रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी मांडली.

सचिन नलवडे म्हणाले, राज्य सरकारने थकीत कर्जदार शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली, तेव्हा नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर मदत करण्याचे जाहीर केले. परंतु अद्याप त्यांना ती मदत मिळाली नाही. कोरोना महामारीच्या काळात आज सर्व स्तरातील जनता अडचणीत आहे. तशीच शेतकऱ्यांचीही आर्थिक परिस्थिती ठीक नाही. त्यामुळे सरकारने ती ५० हजारांची मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावी किंवा त्या रकमेतून ही वीज बिलाची रक्कम वळती करून घेऊन उरलेली रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी केली.

- चौकट

... अशी मिळणार सवलत

सवलत: मुदत

५० टक्के : ३१ डिसेंबर २०२१ अखेर

३० टक्के : ३१ डिसेंबर २०२२ अखेर

२० टक्के : ३१ डिसेंबर २०२३ अखेर

- चौकट

सवलत मिळविण्यासाठी बिल भरा

तीस मीटरच्या आत सर्व कनेक्शन तात्काळ देण्यात येणार आहेत. यापेक्षा जास्त अंतर असलेल्या ग्राहकांना विविध प्रणाली पर्याय उपलब्ध करून कनेक्शन देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नवाळे यांनी यावेळी स्पष्ट केले. ग्राहकांनी सवलतींचा फायदा घेण्यासाठी वेळीच बिल भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

फोटो :

कॅप्शन : पार्ले, ता. कऱ्हाड येथे वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त अभियंता नवाळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अविनाश नलवडे, सचिन नलवडे आदी उपस्थित होते.

Web Title: Communication of electricity distribution company with farmers for bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.