कोविड उपचारांसाठी कंपन्यांनी सामाजिक भान ठेवावे : उदयनराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:41 AM2021-05-09T04:41:05+5:302021-05-09T04:41:05+5:30

सातारा : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्योगांनी सामाजिक दायित्व निधीचा विनियोग करून कोविड उपचारासाठी दवाखाना उभा करावा, ...

Companies should be socially conscious for covid treatment: Udayan Raje | कोविड उपचारांसाठी कंपन्यांनी सामाजिक भान ठेवावे : उदयनराजे

कोविड उपचारांसाठी कंपन्यांनी सामाजिक भान ठेवावे : उदयनराजे

Next

सातारा : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्योगांनी सामाजिक दायित्व निधीचा विनियोग करून कोविड उपचारासाठी दवाखाना उभा करावा, यासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

जिल्ह्यातील एसईझेड आणि डी झोनचा फायदा घेतलेल्या कंपन्यांची बॅलन्स शिट प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी मागवाव्यात तसेच कायद्याने अनिवार्य असलेल्या सामाजिक दायित्व निधी सीएसआरमधून सातारा जिल्हयातील नागरिकांसाठी कोविड़ उपचारासाठी दवाखाना उभा करावा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी यांना केल्या.

त्या उदयोगांच्या बॅलन्स शिट पुढील बैठकीत बरोबर घेऊन, महाराष्ट्र राज्य औद्योगिक मंडळाचे अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक लवकर घेण्यात यावी, अशा सूचना प्रभारी जिल्याधिकारी यांना केली.

तसेच कंपन्या हा खर्च करून स्थानिक नागरिकांवर उपकार करत नसून, ते त्यांना कायद्याने बंधनकारक आहे. जर या निधीमधून स्थानिक जनतेसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली नाही, तर कंपन्यांनी शासकीय योजनांचा आतापर्यंत घेतलेला फायदा याचा हिशोब करून त्यासंदर्भात वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी बैठकीत दिला. यावेळी बैठकीला तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

Web Title: Companies should be socially conscious for covid treatment: Udayan Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.