शिवसेनाला योग्यवेळी भरपाई : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 05:43 PM2020-12-19T17:43:00+5:302020-12-19T17:45:16+5:30
Jayant Patil News Satara : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढली. शिवसेनेला काही प्रमाणात अपयश पदरात पडले असले तरी त्याची भरपाई आगामी काळात केली जाईल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केले.
सातारा विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढली. शिवसेनेला काही प्रमाणात अपयश पदरात पडले असले तरी त्याची भरपाई आगामी काळात केली जाईल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केले.
मंत्री जयंत पाटील हे साताऱ्यात आले असताना गुरुवारी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमार्फत उमेदवार उभे केले. काही ठिकाणी आघाडीला यश मिळाले, तर काही ठिकाणी मिळाले नाही. यश-अपयश हे कुणाच्या पदरात पडले यापेक्षा आम्ही सगळे एकत्रित लढलो, हे महत्त्वाचे आहे. यश अपयश हे त्या-त्या परिस्थितीवर अवलंबून असते.
दरम्यान, आगामी निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र लढले तर सर्वांनाच यश मिळेल, काही ठिकाणी कमी जास्त झाले असेल तर त्याची भरपाई पुढे होईलच. मात्र आगामी निवडणुका एकत्रित लढण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.