पाणी निचऱ्याचे काम तातडीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:43 AM2021-07-14T04:43:47+5:302021-07-14T04:43:47+5:30
यावेळी महामार्ग विभागाचे उपअभियंता निखिल पानसरे, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नानासाहेब जाधव, इंद्रजित चव्हाण, खादी ग्रामोद्योगचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, ...
यावेळी महामार्ग विभागाचे उपअभियंता निखिल पानसरे, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नानासाहेब जाधव, इंद्रजित चव्हाण, खादी ग्रामोद्योगचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, सैदापूरचे माजी उपसरपंच सचिन पाटील, तानाजी माळी, धनाजी जाधव, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, दत्तात्रय जाधव, सतीश जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.
पावसाळ्यात जोराच्या पावसामुळे कृष्णा कॅनॉल ते गजानन सोसायटी भागांत ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचत असल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत असतो. शिवाय या भागातील घरांमध्ये पाणी साचून नुकसान होत असते. याबाबत वेळोवेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. या महामार्गानजीक अण्णा नांगरेनगर हा भाग व आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने याचा निचरा होण्यासाठी जागा नाही. त्यामुळे हे सगळे पाणी महामार्गावर येत असते. यासाठी अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून निचरा होईल, असे तीन ठिकाणावर मोठ्या पाईप घालून हे सर्व पाणी मोरीमार्गे ओढ्याला व तेथून नदीला सोडण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. याच कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी करून अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली.
संबंधित काम त्वरित पूर्ण करावे. हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. काम पूर्ण झाल्यावर पावसाळ्यात महामार्गावरील वाहतुकीची होणारी कोंडी व आसपासच्या भागांतील घरांचे होणारे नुकसान टाळूा जाईल. यासाठीच हे काम तातडीने व्हावे, अशा सूचनाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिल्या.
फोटो : १३केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाड येथे कॅनॉल ते गजानन हौसिंग सोसायटी यादरम्यान मोठ्या पाईप टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याची पाहणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.