कऱ्हाड - विटा मार्गावरील पाणी निचऱ्याची कामे त्वरित पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:11+5:302021-07-12T04:24:11+5:30

कऱ्हाड : कऱ्हाड - विटा महामार्गावर गजानन सोसायटी दरम्यान पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठत असते. या पाण्याचा निचरा व्हावा, ...

Complete drainage works on Karhad-Vita road immediately | कऱ्हाड - विटा मार्गावरील पाणी निचऱ्याची कामे त्वरित पूर्ण करा

कऱ्हाड - विटा मार्गावरील पाणी निचऱ्याची कामे त्वरित पूर्ण करा

Next

कऱ्हाड : कऱ्हाड - विटा महामार्गावर गजानन सोसायटी दरम्यान पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठत असते. या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी मोठे पाईप टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. या कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना हे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी महामार्ग विभागाचे उपअभियंता निखिल पानसरे, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नानासो जाधव, इंद्रजित चव्हाण, खादी ग्रामोद्योगचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, सैदापूरचे माजी उपसरपंच सचिन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य तानाजी माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी जाधव, बाळासो जाधव, दत्तात्रय जाधव, सतीश जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.

पावसाळ्यात जोराच्या पावसामुळे कृष्णा कॅनाल ते गजानन सोसायटी भागात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचत असल्याने याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत असतो. शिवाय या भागातील घरांमध्ये पाणी साचून नुकसान होते. याबाबत वेळोवेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. या महामार्गानजीक अण्णा नांगरे नगर हा भाग व आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने याचा निचरा होण्यासाठी जागा नाही. यामुळे हे सगळे पाणी महामार्गावर येत असते. यासाठी अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून निचरा होईल, अशा तीन ठिकाणांवर मोठे पाईप घालून हे सर्व पाणी मोरीमार्गे ओढ्याला व तिथून नदीला सोडण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. याच कामाची पाहणी पृथ्वीराज चव्हाण यांनी करून अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली व सूचना केल्या.

फोटो

Web Title: Complete drainage works on Karhad-Vita road immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.