शंभर कोटींची निविदा प्रक्रिया पूण
By admin | Published: September 4, 2014 11:26 PM2014-09-04T23:26:55+5:302014-09-05T00:20:05+5:30
नीरा देवघर प्रकल्प : विरोधकांचे आव्हान स्वीकारले; रणजितसिंहांचा दावार्
फलटण : मी पदावर येताच रखडलेल्या निरा-देवघर प्रकल्पातील ६५ ते १०० किलोमीटरपर्यंत कालव्याच्या कामांची शंभर कोटी रुपयांची निविदा पूर्ण झाली असून शंभर किलोमीटर टप्प्याप्रमाणे मीरगाव येथे एका वर्षात पाणी येणार आहे. विरोधकांचे आव्हान आपण स्वीकारले असून आधी केल मग सांगितले, असा दावा कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, ‘सर्वात जास्त सिंचनाचा वाटा फलटण तालुक्याला मिळाला असून हा लाभ आपल्याला मिळविण्यासाठी कृष्णा खोरेच्या अभियंत्यांनी अपार मेहनत घेतली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्या सहकार्याने मला थोड्या दिवसात हे काम करणे शक्य झाले असून दोघेही जिल्ह्याचे असल्याने लवकरच निधी मिळून कामाला सुरूवात होणार आहे. साधारण एका वर्षात पाणी मिरगाव येथे येणार आहे.’
रणजितसिंह नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, ‘या कामाबरोबर धुमाळवाडी येथील टाकीचे काम उद्यापासून सुरू होत असून मुळीकवाडी व ढवळ येथे सहा मायनर गेटद्वारे पाणी तलावात सोडण्याचे कामही सुरू होणार आहे.
यावेळी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता ए. ए. कपोले, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यु. व्ही. सिदमल, धोम-बलकवडी प्रकल्प विभाग वाईचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. माने, दिगंबर आगवणे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस जयकुमार शिंदे, नगरसेवक अनुप शहा आदींची उपस्थित होती. (प्रतिनिधी)
जास्त न बोलता व विरोधकांच्या टिकेवर लक्ष न देता थोडा अवधी आपल्या हातात आहे, हे विचारात घेऊन या कामांना गती देण्यावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे यासाठी पंधरा वर्ष न लागता केवळ साठ दिवसांत हे काम मी पूर्ण करू शकलो, असा टोला यावेळी नाईक-निंबाळकर यांनी लगावला.