डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; २०२२ संपेपर्यंत पूर्ण झाले तरी बरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:29 AM2021-06-01T04:29:13+5:302021-06-01T04:29:13+5:30

सातारा : जिल्ह्याला आठवडाभरात कशीबशी आठ हजार ते नऊ हजार लस मिळत आहे. या स्थितीत डिसेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण ...

Complete vaccination by December is difficult; Even if it is completed by the end of 2022, it is better! | डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; २०२२ संपेपर्यंत पूर्ण झाले तरी बरे!

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; २०२२ संपेपर्यंत पूर्ण झाले तरी बरे!

Next

सातारा : जिल्ह्याला आठवडाभरात कशीबशी आठ हजार ते नऊ हजार लस मिळत आहे. या स्थितीत डिसेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण होणे सातारा जिल्ह्यात शक्यच नसल्याचे समोर आले आहे. इतक्या संथगतीने लसीकरण सुरू आहे. २०२२ तर सोडाच २०२३ उजाडेल, असेही आरोग्य विभागाचे अधिकारी खासगीमध्ये बोलत आहेत.

जिल्ह्यात सुरुवातीला लसीकरणाला अत्यंत अल्प प्रतिसाद होता. लस घेतल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम होतात, असा लोकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे लोक लस घेण्यासाठी धजावत नव्हते. मात्र जसजसा कोरोनाचा शिरकाव घरात होऊ लागला तसे लसीचे महत्त्व नागरिकांना पटू लागले. त्यामुळे मग लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी होऊ लागली. ही गर्दी इतकी वाढली की, प्रशासनाच्या हाताबाहेर गर्दी होऊ लागली. सरतेशेवटी प्रशासनाला टोकन पद्धत अवलंबावी लागली. मात्र तरीसुद्धा गर्दी आवरेना. पहाटे तीन वाजता लोक लसीकरणासाठी रांगेमध्ये उभे राहू लागले आहेत, अशी एकंदरीत परिस्थिती असताना सातारा जिल्ह्यात लसीचा वारंवार तुटवडा होत आहे. जिल्ह्यात ४४६ लसीकरण केंद्र असून ही सर्व केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. यातील केवळ दोनशे केंद्रे सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आता अशा पद्धतीने जर लसीकरण होणार असेल तर २०२३ डिसेंबर या महिन्यांमध्ये शासन १०० टक्के लसीकरण पूर्ण करेल, असा दावा शासन करत आहे. मात्र हा दावा सातारा जिल्ह्यामध्ये कितपत यशस्वी होतोय याची शंकाही उपस्थित होते आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे लसीचा होणारा वारंवार तुटवडा हेच एकमेव कारण आहे. दिवसाला सध्या ८००० तर कधी ५००० असे लसीकरण होत आहे. यावरूनच लसीकरणाचा वेग आपल्याला दिसून येईल. गत काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये रोज २८ हजार ते २९ हजार असे लसीकरण होते. सध्या हा वेग इतका कमी आला आहे की, दिवसाला दहा हजारसुद्धा लसीकरण होत नाही. लसी अभावी अत्यंत संथ गतीने लसीकरण सुरू आहे.

चौकट: फक्त दोनशे केंद्रांवर लसीकरण

जिल्ह्यात ४४६ लसीकरण लसीकरण केंद्रे सुरू असून यातील फक्त २०० लसीकरण केंद्रांवर सध्या लसीकरण करण्यात येत आहे. कारण लसीचा होणारा वारंवार तुटवडा हे मुख्य कारण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कधीकधी लसीचा पुरवठा जास्त होतो. त्या दिवशी मग अडीचशे-तीनशे लसीकरण केंद्रे सुरू असतात. परंतु लस उपलब्ध झाली नाही तर लसीकरण केंद्रे ही वेळ पडल्यास बंद ठेवावी लागत आहेत.

चौकट: १८ वर्षांखालील लसीकरण हे केवळ स्वप्नच!

शेवटच्या टप्प्यात शासनाने १८ वर्षांखालील लसीकरणाचे नियोजन केले आहे. मात्र ते सध्या कागदावरच दिसून येत आहे.

जिल्ह्यात या वयोगटातील साधारण सात लाख लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी कोणती लस वापरणार, किती डोस द्यावे लागतील, किती दिवसाच्या अंतराने द्यावे लागतील, याचे सध्या तरी नियोजन शासनाकडे नाही.

१८ वर्षांवरील लोकसंख्येचे लसीकरण याचा ताळमेळ शासनाकडे नसताना खालील लाभार्थ्यांचे लसीकरण करणे म्हणजे केवळ स्वप्नच राहते की काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अजूनही या गटातील लसीकरण बंद आहे.

कोट: किमान पाच लाख लसीचा पुरवठा करावा, अशी आम्ही मागणी वारंवार करत आहोत. पण पुरवठा अत्यंत कमी आहे. आठवड्याला वीस ते तीस हजार डोस मिळतात, पण मागणी प्रचंड असल्याने हे डोस अपुरे पडत आहेत.

डॉ. अनिरुद्ध आठले, जिल्हा आरोग्य अधिकारी

चौकट: लसीकरण प्रारंभ १६ जानेवारी

प्रत्येक दिवशी- २७००

प्रत्येक आठवड्याला-४०४८

प्रत्येक महिन्याला ६७४८

........

फेब्रुवारी महिन्यात झालेले लसीकरण

प्रत्येक दिवशी-८७६४

प्रत्येक आठवड्याला-१२६६६

प्रत्येक महिन्याला-३८८६५

.........

मार्च -

प्रत्येक दिवशी-२५२८६

प्रत्येक आठवड्याला-३९३८७

प्रत्येक महिन्याला-११३५२४

............

एप्रिल

प्रत्येक दिवशी-१०८३२

प्रत्येक आठवड्याला-१२०७५८

प्रत्येक महिन्याला-४४७०३७

...........

मे

प्रत्येक दिवशी-२४८४३

प्रत्येक आठवड्याला-१३४३३

प्रत्येक महिन्याला-१२७४८४

Web Title: Complete vaccination by December is difficult; Even if it is completed by the end of 2022, it is better!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.