सातारा जिल्'ात बंदला संमिश्र प्रतिसाद; २० दिवसांत तीनवेळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 07:21 PM2020-01-29T19:21:09+5:302020-01-29T19:23:16+5:30
गत २० दिवसांत तीनवेळा बंद ठेवण्यात आला आहे. वारंवार एकाच कारणासाठी पुकारण्यात येणा-या बंदमुळे व्यापा-यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये अनेक व्यापारी सहभागी झाले नाहीत. शहरातील बहुतांश व्यवहार सुरळीत होते.
सातारा : ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी बुधवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला जिल्'ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. साता-यात रॅली तर मायणी आणि क-हाडमध्ये मोर्चा काढण्यात आला.
साताºयातील व्यापाऱ्यांनी बुधवारच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले होते. गत २० दिवसांत तीनवेळा बंद ठेवण्यात आला आहे. वारंवार एकाच कारणासाठी पुकारण्यात येणा-या बंदमुळे व्यापा-यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये अनेक व्यापारी सहभागी झाले नाहीत. शहरातील बहुतांश व्यवहार सुरळीत होते.
बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून राजवाड्यापर्यंत रॅली काढली. या रॅलीमध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजवाडा आणि पोवईनाका या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. मात्र सकाळच्या सुमारास भाजी मंडईतील देवाण-घेवाण ठप्प झाली होती; परंतु इतर व्यवहार दिवसभर सुरळीत होते. एसटी बस, रिक्षाही या बंदमध्ये सहभागी झाल्या नाहीत. शाळा, महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू होती.
दरम्यान, खटाव तालुक्यातील मायणी येथे विविध संघटनांमार्फत मोर्चा काढून बंद पुकारण्यात आला. मोर्चाची सुरुवात व शेवट राष्ट्रगीताने झाला. या मोर्चामध्ये सर्व मुस्लीम संघटना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, भीमराजा प्रतिष्ठान, लहुजी नगर प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी सकाळपासून आपली दुकाने बंद ठेवली होती. या बंदमध्ये बहुजन मुक्ती मोर्चा, रहिमतपूर मुस्लीम पर्सनल लॉ, रहिमतपूर व्यापारी संघटना तसेच रहिमत सामाजिक संस्था या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.