कुपोषण मुक्तीसाठी सर्वंकष प्रयत्न गरजेचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:44 AM2021-09-21T04:44:21+5:302021-09-21T04:44:21+5:30
येथील राजेसंघर्ष प्रतिष्ठानच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण आहार महिना ...
येथील राजेसंघर्ष प्रतिष्ठानच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण आहार महिना म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्यावतीने बालकांना आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष योगेश पाटणकर, माजी उपसभापती रमेश मोरे, राजाभाऊ काळे, कुंभारगावच्या सरपंच सारिका पाटणकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका कुसूम दीक्षित, अरुंधती गरुड, रमेश नावडकर, आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विभागातून आलेल्या सर्व बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषध व गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पौष्टिक पोषण आहाराचे वाटप करून यापुढेही या बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना पोषण आहार पुरविणार असल्याचे योगेश पाटणकर यांनी सांगीतले.
अनिल डाकवे, नानासाहेब काजारी, राजेंद्र देसाई, प्रदीप देसाई उपस्थित होते. रमेश नावडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो : २०केआरडी०७
कॅप्शन : कुंभारगाव (ता. पाटण) येथील राजेसंघर्ष प्रतिष्ठानच्यावतीने राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांच्याहस्ते बालकांसाठी पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.