राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 07:07 PM2019-09-27T19:07:31+5:302019-09-27T19:09:05+5:30
जिल्हा बंदचा सर्वाधिक परिणाम सातारा, खटाव, वाई, खंडाळा, कोरेगाव, जावळी तालुक्यांत जाणवला. खटावसह पुसेसावळी, औंध, मायणी, तसेच वाई तालुक्यातील पाचवडमध्ये कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवला.
सातारा : माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘ईडी’कडून सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. त्याला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला.
जिल्हा बंदचा सर्वाधिक परिणाम सातारा, खटाव, वाई, खंडाळा, कोरेगाव, जावळी तालुक्यांत जाणवला. खटावसह पुसेसावळी, औंध, मायणी, तसेच वाई तालुक्यातील पाचवडमध्ये कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवला.
कºहाड तालुक्यातील उंब्रजमध्ये व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवली. लोणंदमध्ये सकाळी दहापर्यंत मोजकीच दुकाने बंद होती. त्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.
वाईमध्ये अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व व्यवहार ठप्प
वाई : माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालयामार्फत (ईडी) करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी वाई शहर व तालुका राष्ट्रवादीच्यावतीने बंदचे आवाहन केले होते. याला वाईतील व्यापाºयांनी कडकडीत बंद पाळून प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सुविधा वगळता मुख्य बाजारपेठेतील सर्व व्यवहार ठप्प होते.
दरम्यान, राष्ट्रवादीतर्फे नायब तहसीलदार राऊत यांना दिलेल्या निवेदन दिले. त्यानुसार सकाळी दहा वाजता येथील किसन वीर चौकात राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सर्व आजी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळपासूनच गजबजणारी महात्मा फुले भाजी मंडई शुक्रवारी ओस पडली होती. सराफ बाजारपेठ व बसस्थानक परिसरातील सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. दवाखाने, औषधांची दुकाने या अत्यावश्यक सुविधा वगळता शहरातील सर्व व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते.
बंद पुकारण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत वाईतील व्यापाºयांना बंदमुळे कसलाही त्रास होऊ नये, यासंबंधी चर्चा होऊन पूर्वसूचना म्हणून एक दिवस अगोदर सोशल मीडियावरून वाई बंदची माहिती दिली जात होती.