राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एक हजार प्रकरणांत तडजोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:06 PM2019-07-15T14:06:31+5:302019-07-15T14:08:26+5:30
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ११ हजार ३३१ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १००५ प्रकरणात तडजोड झाली. त्यातून एकूण १९ कोटी २५ लाख ३८ हजार २६ रुपयांची वसुली करण्यात आली.
सातारा : राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ११ हजार ३३१ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १००५ प्रकरणात तडजोड झाली. त्यातून एकूण १९ कोटी २५ लाख ३८ हजार २६ रुपयांची वसुली करण्यात आली.
विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश अनिस ए.जे. खान, विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव प्रविण कुंभोजकर यांच्यासह इतर न्यायाधीश उपस्थित होते.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण वादपूर्व १५७१९ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी ४१४ प्रकरणे निकाली निघाली. त्यामध्ये एकूण ३,९९,८९,१८४ रुपयांची वसुली करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात एकूण ११३३१ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी १००५ प्रकरणात तडजोड झाली. त्यामध्ये एकूण १९,२५,३८,०२६ रुपयांची वसुली करण्यात आली.
३५६ भूसंपादन प्रकरणांपैकी २७ प्रकरणे निकाली निघाली असून त्यामध्ये २,३३,५१,९७५ रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. तसेच २६३ मोटार अपघात प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २७ प्रकरणे निकाली निघाली असून १,१७,५४,३४३ इतकी नुकसान भरपाई रक्कम देण्यात आलेली आहे.