रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत तडजोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:19+5:302021-07-08T04:26:19+5:30

सातारा : कमी दराच्या निविदा रद्द करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रकारामध्ये सातारा पालिकेचे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले ...

Compromise in the road tender process | रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत तडजोड

रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत तडजोड

Next

सातारा : कमी दराच्या निविदा रद्द करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रकारामध्ये सातारा पालिकेचे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांनी संगनमताने हा प्रकार केला असून, या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी लेखी तक्रार नगर विकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

कदम यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जात नमूद आहे की, सातारा पालिकेने दि. ६ एप्रिल रोजी सातारा शहरातील तेरा रस्त्यांच्या ई निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. एका ठेकेदाराने प्रस्तुत दराच्या कमी किमतीने निविदा भरलेली असताना मी काम करू शकणार नाही, असे पत्र ठेकेदाराकडून घेण्यात आले. संबंधित निविदा रद्द करताना सक्षम समितीची मंजुरी व शुद्धिपत्रक प्रसिद्ध करणे अपेक्षित असताना ती प्रक्रिया करण्यात आली नाही. या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना याच ठेकेदाराची दुसरी निविदा परस्पर उघडण्यात आली. हा बेकायदा प्रकार अधिकारी व पदाधिकारी यांच्या संगनमताने झाला आहे.

एकीकडे कमी दराने काम करणारे ठेकेदार नाकारायचे तर दुसरीकडे ज्यांची काम करायची क्षमता नाही, अशा ठेकेदारांच्या गळ्यात कामे मारायची असा प्रकार सध्या नगरपालिकेत सुरू आहे. या प्रकरणात सातारा पालिकेचे तब्बल पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा आरोप करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी अविनाश कदम यांनी केली आहे.

Web Title: Compromise in the road tender process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.