चाफळ शाळेला संगणक संच भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:40 AM2021-05-06T04:40:38+5:302021-05-06T04:40:38+5:30
चाफळ : चाफळसारख्या ग्रामीण भागातील मुला-मुलींना संगणकीय ज्ञान मिळावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासत स्टेट बँक आँफ ...
चाफळ : चाफळसारख्या ग्रामीण भागातील मुला-मुलींना संगणकीय ज्ञान मिळावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासत स्टेट बँक आँफ इंडियाच्या क्षेत्रीय उद्योग कार्यालयाने जिल्हा परिषद शाळा, चाफळला पाच संगणक संच भेट दिले आहेत. त्यांचा उपयोग येथील मुला-मुलींना होणार असून, बॅंकेचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन केंद्रप्रमुख अर्जुन पाटील यांनी केले.
चाफळ येथील जिल्हा परिषद शाळेला स्टेट बँक इंडियाच्या क्षेत्रीय उद्योग कार्यालय, सातारा यांच्यातर्फे देण्यात आलेल्या पाच संगणक संचांचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्टेट बॅंकेचे वरिष्ठ व्यवस्थापक सुनील कोठारी, बॅंकेचे उपव्यवस्थापक अनिल पोरे, शाम जोशी, क्षमा जोशी, संदेश कुलकर्णी, सागर लोंखडे, तानाजी गुजर, प्रसाद ढेबे, शिक्षिका वर्षाताई आगादीगे, उत्तम साळुंखे, आदी उपस्थित होते.