गृहविलगीकरणातील रुग्ण वाढवतायत चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:58+5:302021-07-02T04:26:58+5:30

सातारा : गृहविलगीकरण बंद करून जिल्हा प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण सुरू केले. परिणामी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली. तरीही १ ...

Concerns over homelessness patients increasing! | गृहविलगीकरणातील रुग्ण वाढवतायत चिंता !

गृहविलगीकरणातील रुग्ण वाढवतायत चिंता !

googlenewsNext

सातारा : गृहविलगीकरण बंद करून जिल्हा प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण सुरू केले. परिणामी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली. तरीही १ हजार २०८ रुग्ण अद्यापही गृहविलगीकरणात असून, हे रुग्ण प्रशासनाची चिंता वाढवू लागले आहेत. कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी या रुग्णांनाही संस्थात्मक विलगीकरणात हलविणे गरजेचे आहे.

सातारा जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा अक्षरश: विस्फोट झाला. कोरोनाबाधित व मृतांच्या संख्येने सर्व उच्चांक मोडीत काढले. प्रयत्न करूनही बाधितांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाला संचारबंदी लागू करावी लागली. तरीही कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढतच गेला. कारण रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याने १८ हजारांहून अधिक रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत होते. या रुग्णांवर कोणोचेही निर्बंध नव्हते.

ही चूक लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने गृहविलगीकरण बंद करून ठिकठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था उभी केली. कोरोनाबाधितांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले. परिणामी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची दैनंदिन संख्या अडीच हजारांहून हजारावर आली. असे असले तरी आजही १ हजार २०८ रुग्ण अद्यापही घरातूनच उपचार घेत आहे. या रुग्णांवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे हे रुग्ण पुन्हा एकदा कोरोनाचे वाहक ठरू शकतात. संक्रमण वाढण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने अशा रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तातडीने संस्थात्मक विलगीकरणात दाखल करणे गरजेचे बनले आहे.

(चौकट)

बाधितांचा लेखाजोखा

एकूण पुरुष महिला

गृहविलगीकरण १२०८ ६५७ ५५१

संस्थात्मक विलगीकरण ३९५६ २२०८ १७४७

(चौकट)

गर्दीवर नियंत्रण हवे

संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्याने जिल्ह्याची बाजारपेठेत सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत गजबजून जात आहे. कोरोना संपला या आविर्भावात जो-तो खरेदीसाठी घराबाहेर पडत आहे. बाजारपेठेतील या गर्दीवर कोणाचेही कसलेच निर्बंध आता राहिलेले नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर कोरोना परिस्थिती पुन्हा गंभीर बनू शकते.

Web Title: Concerns over homelessness patients increasing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.