जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 02:46 PM2019-12-07T14:46:09+5:302019-12-07T14:52:28+5:30
सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिसांनी जिल्ह्यात विविध चार ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा टाकून नऊजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ६० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
सातारा : शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिसांनी जिल्ह्यात विविध चार ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा टाकून नऊजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ६० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
सातारा तालुका पोलिसांनी गोजेगाव, ता. सातारा येथील एका हॉटेलच्या आडोशाला सुरू असणाऱ्याबापू दारू अड्ड्यावर छापा टाकून बापू रामचंद्र चव्हाण (वय ४५, रा. चिंचणेर, निंब, ता. सातारा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १५ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.
अंगापूर वंदन, ता. सातारा येथे छापा टाकून विनायक मोहन शिखरे (वय ३४, रा. अंगापूर वंदन) याच्या ताब्यातून देशी दारूच्या १३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच रामनगर येथून अर्जुन लक्ष्मण देशमुख (वय ५४) याच्याजवळ दारूच्या २० बाटल्या सापडल्या. साताºयातील अंजठा चौकातील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला हिराबाई निंबाळकर (वय ७२, रा. विलासपूर गोडोली) या महिलेकडे तब्बल २०५ दारूच्या बाटल्या सापडल्या.