नव्वदीनंतरही आत्मविश्वास दांडगा; २३० वृद्धांची कोरोनावर मात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:01+5:302021-06-10T04:26:01+5:30
वृद्धांनी दाखवला विश्वास; महामारीला केले चितपट लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जिल्ह्यात मरण पावणाऱ्यांची संख्या ...
वृद्धांनी दाखवला विश्वास; महामारीला केले चितपट
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जिल्ह्यात मरण पावणाऱ्यांची संख्या फार मोठी होती. यातही तरुणांचे आणि ६० ते ७० वयोगटातील प्रमाण जास्त होते. मात्र सातारा जिल्ह्यात जिल्ह्यात ९० पेक्षा जास्त वय असलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य होते. जिल्ह्यातील तब्बल २३० नव्वदी पार लोकांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्याला पहिल्या-दुसऱ्या या दोन्ही लाटांनी अक्षरचा धडका मारल्या. पहिल्या लाटेमध्ये पन्नाशी पूर्ण केलेले अनेक लोक बाधित सापडले. विशेषतः नव्वदी पार केलेले लोक विविध आजारांनी आधीच ग्रस्त असतात, अशा लोकांना कोरोना व्याधीने सर्वप्रथम गाठले. जे लोक कामाला बाहेर जात होते, त्यांच्या माध्यमातूनच घरात बसलेल्या वृद्धांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली.
वयाची नव्वदी पार केलेले लोक कसे जगणार या प्रश्न संपूर्ण शासकीय यंत्रणेला सतावत होता. जिल्ह्यात २५७ इतके वयाची नव्वदी पार केलेले रुग्ण सापडले. त्यापैकी २३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. अनेक पावसाळे पाहिले हे नव्वदीतील लोक तरुणांसाठी एक आयडॉल ठरले. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असली की मरणाची चिंता राहत नाही हेच यातून समोर आले.
या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.
१) ९० पेक्षा जास्त वयाचे एकूण पॉझिटिव्ह - २५७
बरे झाले - २३०
पहिल्या लाटेतील पॉझिटिव्ह - ७८
दुसऱ्या लाटेतील पॉझिटिव्ह -१७९
पहिल्या लाटेतील मृत्यू - १७
दुसऱ्या लाटेतील मृत्यू - १०
२) ५० ते ६० वयोगटात सर्वाधिक मृत्यू (बॉक्स) ( आजअखेर) - ७४३
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोणत्या वयोगटात सर्वाधिक मृत्यू याचा बॉक्स
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ६१ ते ७० या वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. अनेकांचे मृत्यूदेखील झाले. या गटामध्ये जे नागरिक असतात त्यांना हृदयविकार अथवा मधुमेह असे पूर्वीचे आजार असल्याने या वयोगटातील लोक कोरोनावर उपचार सुरू असताना मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त होते.
३) आम्हाला कोणीच हरवू शकत नाही !
कोट..
आम्ही अनेक पावसाळे पाहिले आहेत. प्लेग, पटकी असे आजारदेखील समोर पाहिले. या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला. अनेक जवळचे लोक आजारात गेले. पूर्वी आजारावर उपचार लगेच मिळत नव्हते, आताच्या काळात उपचार मिळतात. आयुर्वेदिक उपचारांचा देखील फायदा झाला.
- सर्जेराव जाधव
कोट..
नैसर्गिक राहणीमान ठेवलं, तर कुठलाही आजार आपण परतवून लावू शकतो. मला कोरोनाची बाधा झाल्यानंतर घरातले सगळेच चिंतेत होते. माझ्या वयाचा विचार केला तर कोरोनातून मी बाहेर पडेल, असे कोणालाच वाटत नव्हते. घरच्या लोकांनी साथ दिली, सेवा केली त्यामुळेच मी आजारमुक्त झाले.
- हौसाबाई धुमाळ